Category: dharashiv

                                           

पशुधनाची खरेदी-विक्री करण्यास 1 जूनपासून प्रतिबं

भारत पशुधन प्रणालीवर जनावरांची नोंद अत्यावश्यक

धाराशिव-  ‘ईअर टॅगिंग’ केल्याशिवाय पशुधनाची खरेदी-विक्री करण्यास 1 जून 2024 पासून प्रतिबंध करण्यात आला आहे. पशुधनाची नोंद भारत पशुधन प्रणालीवर असल्याशिवाय पशुधनाची खरेदी किंवा विक्री करता येणार नाही. या पशुधनास पशुवैद्यकीय दवाखान्यामधून मिळणाऱ्या पशुवैद्यकीय सेवाही दिल्या जाणार नाहीत.त्यामुळे सर्व पशुपालकांनी आपल्याकडील लहान मोठ्या सर्व पशुधनाची ईअर टॅगिंग करुन त्याची नोंद पशुधन प्रणाली अॅपवर लवकरात लवकर करावी.असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. वाय.बी.पुजारी यांनी केले.
                    
राज्यातील सर्व लहान-मोठ्या जनावरांना ईअर टॅगिंग व त्यांची भारत पशुधन प्रणालीवर नोंद बंधनकारक करणेबाबतचा कृषी, – पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग मंत्रालय मुंबई यांचा 27 फेब्रुवारी रोजी शासन निर्णय जाहीर झाला आहे.या निर्णयानुसार भारत पशुधन प्रणालीवर पशुपालकांची सर्व माहिती मोबाईल नंबर,आधार नंबर तसेच पशुपालकाकडे असणारी जनावरांची संपूर्ण माहिती,जनावरांचे वय, लिंग,जात,मिल्कींग स्टेटस् आदी अद्यावत करणे आवश्यक आहे.
                  
1 जून 2024 पासून ईअर टॅगिंग व भारत पशुधन प्रणालीवरील नोंदीशिवाय जनावरांची खरेदी विक्री करता येणार नाही.तसेच शासकीय पशुवैद्यकीय सेवा दिल्या जाणार नाहीत.केंद्र व राज्य शासनाकडून मिळणारे आर्थिक सहाय्य देय होणार नाही.नैसर्गिक आपत्ती,विजेचा धक्का तसेच वन्य पशुच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास मिळणारी नुकसान भरपाईची रक्कम देय होणार नाही.तसेच राज्यातंर्गत जनावरांची वाहतुक करता येणार नाही.तसे केल्यास पशुधनाचे मालक व वाहतुकदारांवर कारवाई करण्यात येणार आहे.जनावरांची मालकी हस्तांतरण करता येणार नाही.वरील सर्व बाबी टाळण्यासाठी सर्व पशुपालकांनी त्यांच्याकडील सर्व जनावरांना नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून ईअर टॅगिंग करून घ्याव्यात. असे जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पुजारी यांनी कळविले आहे.
            
                

दि.22.ते 28जून 2023 चे दरम्यान फिर्यादी नामे लक्ष्मीबाई महादेव काकडे रा. नितळी, ता. जि. धाराशिव यांचे बॅक खात्यातुन कोणीतरी अज्ञात व्यक्तीने युपीआय द्वारे रक्कम काढून फसवणुक केली होती. याबाबत...

READ MORE

कृषी तज्ञांचा शेतकऱ्यांना सल्ला धाराशिव (प्रतिनिधी) – उमरगा तालुक्यातील तुगाव येथे खरीप हंगाम पूर्व गाव बैठकीचे आयोजन दि.१६ मे रोजी करण्यात आले होते.या बैठकीत उपस्थित शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे उगवण...

READ MORE

धाराशिव दि.१६ (प्रतिनिधी) – जिल्ह्यामध्ये सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया हजारो कर्मचाऱ्यांच्या मदतीने दि.७ मे रोजी सुनियोजितपणे पार पडली आहे. या निवडणुकीतील राखीव कर्मचाऱ्यांना निवडणूक भत्ता देण्यात यावा अशी...

READ MORE

धाराशिव  (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त डॉ प्रवीण गेडाम यांची धाराशिव तालुक्यातील पाडोळी (आ) येथील रेशीम प्रगतशील शेतकरी बालाजी पवार यांनी पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयात भेट घेऊन...

READ MORE

दि.१४ मे रोजी 3.00 पोलीस उप अधीक्षक शेलार, उपविभागीय अधिकारी उमरगा, यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस ठाणे उमरगा हद्दीत हॉटेल शौर्यवाडा ते चौरस्ता कडे जाणारे राष्ट्रीय...

READ MORE

तुळजापूर  – श्री तुळजाभवानी मंदिरात ८ कोटी ४५ लाख ९७ हजार रुपयांचा दानपेटी घोटाळा झाला होता. या भ्रष्टाचारात सरकारी अधिकारी गुंतले आहेत म्हणून प्रशासन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत,...

READ MORE

धाराशिव  – 7 मे रोजी 40 – उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. या लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्राच्या मुख्यालयातून मतदान केंद्रस्तरीय पथके आज 6 मे रोजी मतदानाचे साहित्य...

READ MORE

धाराशिव- 7 मे रोजी लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतदान व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाकडून व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे.मतदान केंद्रावर मतदारांना विविध सोईसुविधा उपलब्ध देण्यात येत आहे.उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील...

READ MORE

धाराशिव : लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोमात सुरू आहे. धाराशिव लोकसभेसाठी येत्या 7 मे रोजी मतदान होणार आहे. दुष्काळ आपल्या पाचवीला पूजलेला आहे. त्यामुळे आपल्या भागात आपल्या हक्काच पाणी आणायच...

READ MORE