
अंगणवाडीतील पोषण आहाराचा बोजवारा – धाराशिवमध्ये वाटाण्याच्या उसळीमध्ये किडे आणि मुंग्या
धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील वानेवाडी येथील अंगणवाडीत पोषण आहाराच्या दर्जाबाबत गंभीर निष्काळजीपणा समोर आला आहे. अंगणवाडीतील लहान मुलांना देण्यात आलेल्या वाटाण्याच्या उसळीमध्ये किडे आणि मुंग्या निघाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
या घटनेमुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, प्रशासनाच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लहान मुलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे
