अवैधरित्या गुटखा वाहतुक करणाऱ्यावर उमरगा पोलीसांची कारवाई

अवैधरित्या गुटखा वाहतुक करणाऱ्यावर उमरगा पोलीसांची कारवाई

Spread the love



दि.१४ मे रोजी 3.00 पोलीस उप अधीक्षक शेलार, उपविभागीय अधिकारी उमरगा, यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस ठाणे उमरगा हद्दीत हॉटेल शौर्यवाडा ते चौरस्ता कडे जाणारे राष्ट्रीय महामार्ग बायपास उमरगा येथे वाहन क्र एमएच 14 ईएम 9650 अशोक लिलॅड टॅम्पो या वाहनामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गोवा गुटखाची वाहतुक होणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पोलीस पथकाने नमुद ठिकाणी जावून सदर वाहन चेक केले असता सदर वाहनामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गोवा गुटखा मिळून आला. यातील आरोपी नामे- अर्जुन सुर्यकांत केदार, वय 35 वर्षे, रा. राजेवाडी पो. महाळगी ता. चाकुर जि. लातुर याचे ताब्यात नमुद वाहनात गोवा गुटखा काथ पावडर, 540 किलो, सुगंधी सुपारी गिक्षर 3,600 किलो, स्ट्रीप रोड गोवा गुटखा 1,880 किलो, रिकामे पाउचेस वजीर गुटखा 240 किलो, रिकामे पाउचेस गोवा 1,000 गुटखा 570 किलो वाहना सह असा एकुण 27, 15,100₹ किंमतीचा पानमसाला, गुटखा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल मिळून आलेने जप्त करुन मिळून आलेला माल सह आरोपी नामे- अर्जुन सुर्यकांत केदार, वय 35 वर्षे, रा. राजेवाडी पो. महाळगी ता. चाकुर जि. लातुर यास ताब्यात घेवून आरोपी  विरुध्द पोलीस ठाणे उमरगा येथे गुरनं 301/2024 भा.द.वि. सं. कलम 328, 188, 272, 273,  सह 26(2)(i), 26(2)(iv), 27 (3) (e), 30(2) दंडनिय कलम 59 अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उप निरीक्षक पुंजरवाड हे करत आहे.
          सदर कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक  गौहर हसन उपविभागीय अधिकारी उमरगा, पोलीस उप अधीक्षक  शेलार यांचे मार्गदर्शनाखाली उमरगा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक पारेकर, पोलीस उप निरीक्षक पुजरवाड, सुहास मंडलीक अन्न व सुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन (म.रा) धाराशिव, उपविभागीय अधिकारी उमरगा, कार्यालयाचे अधिकारी अमंलदार पोलीस  ठाणे उमरगा चे पोलीस अमंलदार यांचे पथकाने केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *