
राज्यस्तरीय फॅशन शो मोठ्या दिमाखात संपन्न
धाराशिव: नालंदा कॉलेज ऑफ फॅशन डिझायनिंग, धाराशिव यांच्या वतीने राज्यस्तरीय ड्रेस डिझाईनिंग स्पर्धेचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, धाराशिव येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाले. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून 150 हून अधिक स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकांना अनुक्रमे रोख रु. 10,000, रु. 7,000 आणि रु. 5,000 तसेच सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
स्पर्धेचे उद्घाटन डॉ. स्मिता गवळी यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी दैवशाला हाके, डॉ. रेखा ढगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रदीप रोडे आणि दीपा रोडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. लोखंडे यांनी केले.
स्पर्धेचे आयोजन आणि यशस्वी नियोजन प्राचार्या डॉ. शैलजा पैकेकर आणि प्राचार्या मीना गडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यासाठी प्रा. योगेश जोगदंड, प्रा. उमेश कांबळे, प्रा. नम्रता वरठा, प्रा. आम्रपाली कांबळे, प्रा. कामडी आणि प्रा. दिव्या यांनी विशेष परिश्रम घेतले.
स्पर्धेला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून, स्पर्धकांनी त्यांच्या उत्कृष्ट डिझाईन्सच्या माध्यमातून फॅशनच्या क्षेत्रातील नावीन्यपूर्णता सादर केली. ही स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली असून, भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याची महाविद्यालयाची योजना आहे.


