
जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा सत्कार
धाराशिव – जिल्हा महसूल कर्मचारी संघटना, धाराशिव यांच्या वतीने नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार सर यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव मॅडम, महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितेश काळे, नायब तहसीलदार महादेव शिंदे, दीपक चिंतेवार, प्रमोद चंदनशिवे, जफर शेख, दत्तात्रय मोरे, श्रीहरी गाढवे तसेच महिला प्रतिनिधी काशीद मॅडम, अकोसकर मॅडम, धोंगडे मॅडम आणि इतर महसूल कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सत्कार समारंभात महसूल विभागाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार सर यांनी महसूल कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले आणि प्रशासनासोबत समन्वय साधून काम करण्याचे आवाहन केले.

