ऑनलाईन युपी आयद्वारे फसवणुक करनारा आरोपी सायबर पोलीसांनी केला गजाआड

ऑनलाईन युपी आयद्वारे फसवणुक करनारा आरोपी सायबर पोलीसांनी केला गजाआड

Spread the love



दि.22.ते 28जून 2023 चे दरम्यान फिर्यादी नामे लक्ष्मीबाई महादेव काकडे रा. नितळी, ता. जि. धाराशिव यांचे बॅक खात्यातुन कोणीतरी अज्ञात व्यक्तीने युपीआय द्वारे रक्कम काढून फसवणुक केली होती. याबाबत सायबर पोलीस ठाणे धाराशिव येथे गुरनं 17/2023 कलम 419, 420 भादवि सह 66(सी), 66(डी) महिती तंत्रज्ञात सुधारणा अधिनियम 2008 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचे तपासा दरम्यान मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली बबीता वाकडकर, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे धाराशिव, सहाय्यक पोलीस निरीक्षक, संदीप सावळे, पोहेकॉ/ राहुल नाईकवाडी, पोलीस नाईक प्रवीण बांगर पोलीस अमंलदार प्रकाश भोसले, शशिकांत हजारे, महिला पोलीस अमंलदार महादेवी व्हंदरगुंडे यांनी सदर गुन्ह्याच्या तांत्रिक विश्लेषण केले असता फसवणुक झालेली एकुण रक्कम 98,446 ₹ ही एसबीआय खातेधारक सुबाबाई जाधव यांचे खात्यावर जमा असल्याचे माहिती मिळाली सदरचे खाते त्यांचा मुलगा नामे केशव शेषराव जाधव, रा. पोखरणी ता. गंगाखेड जि. परभणी याने युपी आयद्वारे वापरले असल्याचे निष्पन्न झाले त्यास त्याचे पत्यावर जावून शोध घेतला असता त्याठिकाणी मिळून आला त्यास अटक करण्यात आली असुन पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक बी. एस. वाकडकर या करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *