
कृषी आयुक्त डॉ गेडाम यांची पवार यांनी घेतली भेट
धाराशिव (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त डॉ प्रवीण गेडाम यांची धाराशिव तालुक्यातील पाडोळी (आ) येथील रेशीम प्रगतशील शेतकरी बालाजी पवार यांनी पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयात भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी स्मार्ट प्रकल्प व रेशीम शेती धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कसा राबविता येईल ? या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.