
रस्त्यावर धोकादायकरीत्या वाहन उभे करणाऱ्यांवर कारवाई
परंडा आणि येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन उभे करून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या तीन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
1. परंडा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे वाहन उभे केल्याबद्दल महंम्मद तात्या शिंदे (वय 39) आणि पिंटू लाला जाट (वय 30) यांच्यावर गुन्हे दाखल.
2. येरमाळा बसस्थानकासमोर धोकादायकरीत्या वाहन उभे ठेवल्याबद्दल भाउसाहेब अनिल पवार (वय 23) याच्यावर गुन्हा दाखल.
तिन्ही आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता कलम 285 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.