
माती परीक्षण अहवाल आधारित रासायनिक खताचा संतुलित वापर करावा
कृषी तज्ञांचा शेतकऱ्यांना सल्ला
धाराशिव (प्रतिनिधी) – उमरगा तालुक्यातील तुगाव येथे खरीप हंगाम पूर्व गाव बैठकीचे आयोजन दि.१६ मे रोजी करण्यात आले होते.
या बैठकीत उपस्थित शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक, घरचे बियाणे वापर, सोयाबीन बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक, PMFME, MREGS फळबाग लागवड योजना , भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, सोयाबीन वरील कीड व रोग व्यवस्थापन याबद्दल कृषी सहाय्यक खंडाळकर यांनी मार्गदर्शन केले. तर डॉ पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान २०२४ अंतर्गत राबविण्याच्या विविध बाबी, आत्मा विभागाच्या विविध योजना याबद्दल श्री गरजे पाटील यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच कृषी पर्यवेक्षक सुनील शिंदे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवरती अर्ज करावेत असे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीसाठी महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी ए.बी. पटवारी, कृषी पर्यवेक्षक एस टी शिंदे, कृषी सहाय्यक खंडळकर, आर के घुगरे तसेच प्रकल्प संचालक आत्मा कार्यालयाचे पी बी गर्जे -पाटील, मोईन सयद आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.