
व्हाईस ऑफ मीडियाच्या भूम तालुका अध्यक्षपदी औदुंबर जाधव यांची निवड
भूम प्रतिनिधी : व्हाईस ऑफ मीडियाच्या भूम तालुका अध्यक्षपदी औदुंबर जाधव यांची निवड………
शासकीय विश्रामगृहात व्हाईस ऑफ मीडिया सदस्याची बैठक प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता आहिरे यांच्या अध्यक्षते खाली पार पडली. यावेळी सर्वानुमते जेष्ठ पत्रकार औदुंबर जाधव यांचे नांव पत्रकार सचिन बारगजे यांनी तालुका अध्यक्ष पदासाठी सुचवले याला सर्व व्हाईस ऑफ मीडियाच्या सदस्यांनी पाठींबा दिला व त्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांच्या कामगिरीवर आधारित आहे, ज्यामुळे ते मीडियाच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतील. त्यांची निवड व्हाईस ऑफ मीडिया संस्थेच्या कार्याला एक नवीन दिशा देऊ शकते. असे मत जिल्हा उपाध्यक्ष संतोष वीर यांनी व्यक्त केले तर आभार प्रदर्शन मावळते तालुका अध्यक्ष चंद्रमणी गायकवाड यांनी केले. निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी प्रदेश सदस्य दत्ता आहिरे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष वीर, जिल्हा सरचिटणीस चंद्रमणी गायकवाड कोषाध्यक्ष रवींद्र लोमटे, रोहित चंदनशिवे,श्याम पालके, महावीर बनसोडे, सचिन जाधवर, तानाजी सुपेकर, सचिन बारगजे उपस्थित होते.