नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहिला तर जबाबदारी प्रशासनाची असेल

नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहिला तर जबाबदारी प्रशासनाची असेल

Spread the love

धाराशिव कळंब मतदारसंघातील कळंब तालुक्यात मुख्य पिक असलेल्या सोयाबीनची ७४,६११ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती त्याचबरोबर ज्वारी, बाजरी, कापुस, तुर, मुग, उडीद, सुर्यफुल ही पिके धरुन ८०,३२८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.  तसेच धाराशिव तालुक्यात सोयाबीनची १,०५,७१६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.  तसेच त्याचबरोबर ज्वारी, बाजरी, कापुस, तुर, मुग, उडीद, सुर्यफुल ही पिके धरुन १,१३,१७७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.   धाराशिव जिल्हयामध्ये  मागील काही दिवसापासुन अतिवृष्टी व सततचा पाऊस झाल्यामुळे पेरणी झालेल्या क्षेत्रावरील सर्वच पिके बाधीत झाली आहेत.  कळंब तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे सर्व महसुल मंडळातील पेरणी झालेल्या क्षेत्रावरील १०० टक्के  पिके बाधीत झालेली असतानाही नुकसानीच्या प्राथमिक अहवालात नुकसान बाधीत क्षेत्र कमी दर्शविल्याचे निदर्शनास आले आहे.  तसेच धाराशिव तालुक्यातील काही महसुल मंडळात अतिवृष्टी व काही महसुल मंडळात सततचा पाऊस झाला असल्याने पेरणी झालेल्या क्षेत्रावरील १०० टक्के पिके बाधीत झालेली असतानाही  नुकसानीच्या प्राथमिक अहवालात नुकसान बाधीत क्षेत्र कमी दाखवले आहे.  अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असल्याने हाता तोंडाशी आलेला घास हिराऊन घेतल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.  अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे नुकसान झालेले असतानाही नुकसानीचे तात्काळ पंचनामे करणे आवश्यक होते परंतु अद्यापपर्यंत पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले नाहीत. परीणामी शेतकरी मदतीपासुन वंचित राहण्याची शक्यता आहे.  एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासुन वंचित राहीला तर याची जबाबदारी प्रशासनाची असेल.
तरी अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन अहवाल शासनाला सादर करणेबाबत तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *