श्री साई जनविकास आयटीआय मध्ये आयुध पूजन सोहळा संपन्न

श्री साई जनविकास आयटीआय मध्ये आयुध पूजन सोहळा संपन्न

Spread the love

धाराशिव – डॉ. वेदप्रकाश पाटील एज्युकेशनल कॅम्पस मधील श्री साई जनविकास आयटीआय मध्ये नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा तसेच आयुध पूजा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

डॉ.व्ही.पी.एज्युकेशनल कॅम्पसच्या वतीने पद्मविभूषण भारताचे नामवंत उद्योगपती रतन टाटा यांना आदरांजली वाहण्यात आली.आज भारताने खरे रत्न म्हणजे रतन टाटा यांना गमावले आहे त्यांचे संपूर्ण जीवन हे आपल्या सर्वांसाठी कायमच प्रेरणादायी असेल आणि ते आपल्या मनात कायम असतील असे आदरांजलीपर मनोगत डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी व्यक्त केले.

छत्रपती शिवाजी महाराज,भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन व वर्कशॉप मधील सर्व मशिनरी तसेच शस्त्रांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

भविष्यामध्ये आयटीआयच्या  विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीज मध्ये भरपूर प्रमाणात रोजगार उपलब्ध असेल तसेच स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात असे मार्गदर्शनपर प्रतिपादन डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी केले. एसबीएनएम  फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरज ननवरे यांनी  विद्यार्थ्यांनी व्यवसायाचे परिपूर्ण स्किल घेऊन स्वतःचे उद्योगधंदे उभारावीत असे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून डॉ. प्रतापसिंह पाटील एसबीएनएम फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरज ननवरे, एमएसईबी ऑपरेटर उंबरे,आयटीआयचे व्यवस्थापक डी.एम.घावटे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी निदेशक एस.एस.पुदाले, निदेशक एस.एस. सुतार, एस.एस.भोरे, निदेशक ए.पी.वीर, तसेच प्रथम व द्वितीय वर्षातील प्रशिक्षणार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे  प्रास्ताविक व आभार डी.एम.घावटे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *