व्यसनमुक्ती आणि मधुमेह दुत म्हणून  भरीव कार्य केल्याबद्दल पांडुरंग घोडके यांना राज्यस्तरीय पुरस्काराने कोल्हापूर येथील सयाजी हॉटेल येथे  सन्मानित

व्यसनमुक्ती आणि मधुमेह दुत म्हणून  भरीव कार्य केल्याबद्दल पांडुरंग घोडके यांना राज्यस्तरीय पुरस्काराने कोल्हापूर येथील सयाजी हॉटेल येथे  सन्मानित

Spread the love



प्रतिनिधी – धाराशिव

व्यसनमुक्ती व आरोग्य क्षेत्रात भरीव कामगिरी करून अनेकांना व्यसनमुक्त व मधुमेहमुक्त केल्याबद्दल सारोळा बु.तालुका जिल्हा धाराशिव येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय संस्थेचे सचिव पांडुरंग घोडके यांना कोल्हापूरच्या समर्थ सोशल फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्काराने 29.09.2024 रोजी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पांडुरंग घोडके यांनी समर्थ सोशल फौंडेशनच्या सोबत काम करून राज्यातील विविध भागात 500 पेक्षा अधिक व्यक्तींना तंबाखू, दारू, गुटखा, सिगारेट यापासून मुक्त केले आहे. व्यसनमुक्तीसाठी तसेच मधुमेह रोगमुक्तीसाठी पांडुरंग घोडके मोठी जनजागृती करत आहेत.   युवकांमध्ये व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत असताना त्यांच्यामध्ये जनजागृती करून त्यांनी युवकांना व्यसनमुक्त होण्यासाठी प्रवत्त केले. यामुळे कोल्हापूर येथील समर्थ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार संस्थेचे प्रमुख समाजकार्यासाठी वाहून घेतलेले सर्वांचे प्रेरणास्थान सादिक शेख सर,संचालक सुहास पाटील, अस्लम शेख,सागर देसाई आणि व्यसनमुक्ती स्प्रे तयार करणारे डॉ.आणि संशोधक बी. एस.माने या मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

घोडके यांनी गेल्या 22 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात महिला सक्षमीकरण, महिला शेती शाळा विविध उद्योगांविषयी जनजागृती, सांस्कृतिक कार्यक्रम, शासकीय योजनांची माहिती आदी क्षेत्रात जनजागृती केली आहे.तसेच शेतकरी आत्महत्या रोखणे या विषयांसह रुरल गर्ल एज्युकेशन याच्या माध्यमातून कोरोना काळात आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबातील मुलींना मोफत शिक्षण मिळवून देण्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतलेले आहे. या सोबतच उद्योजकता विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत महिलांना उद्योग सुरू करण्याविषयी त्यांचे मार्गदर्शन चालूच आहे. उषा शिलाई आणि अफार्म संस्था पुणे यांच्या माध्यमातून त्यांनी महिलांना टेलरिंग प्रशिक्षण देऊन व्यवसायात उभे करण्यासाठीही पुढाकार घेतला. यामुळे अनेक महिला आज सक्षमपणे काम करत आहेत. तसेच डिजिटल सखी उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांमध्ये डिजिटल साक्षरता या संदर्भात प्रशिक्षित देऊन त्यांच्या माध्यमातून समाजामध्ये डिजिटल व्यवहार करण्यासाठीही त्यांनी भरीव कामगिरी केली. स्टोरी टेलिंग प्रोग्रामच्या माध्यमातून राज्यातील विविध शालेय विद्यार्थ्यांपर्यंत उद्बोधक व प्रबोधनात्मक गोष्टीचे रेकॉर्डिंग पोहोचवून सुसंस्कारित करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांसाठी ‘उमेद जगण्याची’ हा कार्यक्रम त्यांनी आकाशवाणीच्या माध्यमातून चालवला. तसेच शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आणि कमी खर्चात शेती करण्यासाठीही या संस्थेच्या माध्यमातून पुढाकार घेतला. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना यापूर्वीही अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. समर्थ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यात व्यसनमुक्ती साठी तसेच मधुमेह मुक्तीसाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्यांच्यासोबत  घोडके यांनी व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्तीसाठी प्रचार व प्रसार करून अनेकांना यातून मुक्त केले आहे. यामुळे त्यांना हा पुरस्कार कोल्हापूर येथील 5 स्टार हॉटेल येथे थाटामाटात प्रदान करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *