भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सरोजनी राऊत यांनी उमेद महिला व कर्मचारी संघटनांचे निवेदन स्वीकारले

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सरोजनी राऊत यांनी उमेद महिला व कर्मचारी संघटनांचे निवेदन स्वीकारले

Spread the love



धाराशिव (प्रतिनिधी) – उमेद महिला व कर्मचारी संघटना जिल्हा धाराशिव यांच्या वतीने जिल्हाधिकारी करायलासमोर साखळी उपोषण सुरू आहे. उमेद यांची शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज मंत्रालय अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हा स्वतंत्र कायम स्वरूपाचा विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांना शासनाच्या समक्ष पदावर कायमस्वरूपी समाविष्ट करून घेणे ही प्रमुख मागणी आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित दादा पवार यांच्याकडे पाठपुरावा करून संबंधित उपोषणातील मागण्या मान्य करण्यासाठी प्रयत्न करेन. मागील उमेद महिलांच्या किंवा उमेदच्या संदर्भातले जे महत्त्वाचे निर्णय होते ते महायुती सरकारने पूर्ण केले आहेत. उमेद महिलांचे कामाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या महिलांच्या मागण्या रास्त असल्याचे डॉ. सरोजनीताई राऊत यांनी सांगितले. दरम्यान 2020 मध्ये तत्कालीन ठाकरे सरकार असताना संपूर्ण महाराष्ट्रातून उमेद महिलांनी आझाद मैदान येथे मोर्चा काढला होता. त्यावेळेस उमेद चे खाजगीकरण करण्याचे ध्येय संबंधित राज्य सरकार करत होते त्यावेळेस माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सौ अर्चनाताई पाटील यांच्या माध्यमातून मोठा लढा उभारून त्यांनी त्यांचे चुकीचे धोरण हाणून पाडले असल्याचे सांगितले. दरमहा मिळणारी तीन हजार रुपये रक्कम होती, तर त्या 3000 रू. चे 6000 रू. मानधन करण्याचे काम ही महायुती सरकारनेच केले आहे. आता महिलांना उपोषण करण्याची वेळ येऊ देणार नाही अशी वल्गना विरोधकांकडून केली जात आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत महाराष्ट्रातील भगिनींना दिली जाणारी दरमहा 1500 रुपये ची रक्कम ही तुटपुंजी रक्कम आहे असा विरोधाभास महिलांमध्ये पसरवण्याचे काम विरोधकांकडून होत आहे. त्यावर बोलत असताना डॉ. सरोजनीताई राऊत म्हणाल्या की, या लोकांना ग्रामीण भागातील महिलांची कौटुंबिक परिस्थिती काय माहिती आहे. घर सांभाळत असताना महिलांना ज्या समस्यांना सामोरे जावे लागते ते ओळखून महिलांच्या खात्यामध्ये थेट रक्कम देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *