शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात विविध ठिकाणी प्रवेश….

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात विविध ठिकाणी प्रवेश….

Spread the love



धाराशिव (प्रतिनिधी) – हिंदुत्वाची शान हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन, शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब तसेच शिवसेना नेते युवासेना प्रमुख मा. श्री. आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून,खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली बावी येथील असंख्य युवकांनी तसेच अंबेहोळचे उपसरपंच सरफराज शेख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आ कैलास पाटील यांच्या हस्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला .

यावेळी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वसामान्यांचे प्रश्न आपण सोडवाल आणि हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहचवून शिवसेना संघटना बळकट कराल,असा विश्वास आ कैलास पाटील यांनी व्यक्त केला .


सोमवारी सायंकाळी हा प्रवेश सोहळा पार पडला प्रवेश करणाऱ्यांमध्ये महेश जाधव, चेतन कोळी, सुभाष जाधव, श्रीकांत महाडिक, वैभव जाधव, बबन महाडिक, मेघराज बनसोडे, महादेव पवार, बालाजी तांबे, गणेश जाधव, दादासाहेब जाधव, सोनू पवार, ज्ञानेश्वर आडसुळे, संकेत पवार, यशवंत बनसोडे, छोटू पाटील, संकेत जाधव, मनोज उंडे, सौरभ शिंदे, प्रेम जाधव, श्रीनिवास तांबे, समाधान देशमुख, अभिजित जाधव यांचा समावेश आहे..

यावेळी तालुकाप्रमुख सतीशकुमार सोमाणी, शाम जाधव अंकुश काका मोरे,  गजेंद्र जाधव, सौदागर जगताप, अमोल मुळे, दत्तात्रय जाधव, नवनाथ वाघमारे, गफुर शेख, रमेश जाधव, राजदीप गायकवाड, अल्लाउद्दीन शेख , चांद शेख, शरीफ शेख, अझहर शेख,गणेश सगर, रवी देशमुख, संतोष बेद्रे, इंद्रजित शिंदे, प्रविण तांबे, सत्यपाल नरवडे आदींसह स्थानिक पदाधिकारी, शिवसैनिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *