शिवसेना राज्य ग्रंथालय सेलचा 9 आक्टोबर रोजी मुंबई येथे पहिला मेळावा.

शिवसेना राज्य ग्रंथालय सेलचा 9 आक्टोबर रोजी मुंबई येथे पहिला मेळावा.

Spread the love

धाराशिव (प्रतिनिधी) – शिवसेना राज्य ग्रंथालय सेल कार्यकर्त्यांचा पहिला मेळावा व मंत्री हेमंत पाटील यांचा सत्कार व पदाधिकारी नियुक्तीपत्र वाटप 9 आक्टोबर रोजी मुंबई येथे होत असल्याचे माहिती लक्ष्मण भानवसे जिल्हाध्यक्षांनी दिली आहे.

लक्ष्मण भानवसे यांनी अधिकची माहिती देताना नमूद केले आहे की राज्यात 11,700 शासनमान्य ग्रंथालये कार्यरत आहेत. या वाचनालयांच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागात गरजू वाचकांना व स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना वृत्तपत्र व ग्रंथ वाचण्यासाठी शासन मोफत उपलब्ध करून देत असते. या योजनेमुळे दरवर्षी हजारो मुले – मुली स्पर्धा परीक्षेत पास होत आहेत.

2012 ते 2022 तब्बल 11 वर्षे मागच्या सरकारने या चळवळीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे ही चळवळ डबघाईस आली आहे.

अल्पशा मानधनावर काम करण्यास कर्मचारी मिळत नाहीत. वाढत्या महागाईमुळे दर्जेदार ग्रंथ वाचकांना देणे अशक्य झाले आहे. ही बाब शिवसेना पक्ष कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या निदर्शनास आणून दिली असता मिळणाऱ्या अनुदानात 60% वाढ तातडीने मंजूर केली आहे.

या चळवळीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना पक्षाच्या मंत्रीमहोदयांनी अधिक लक्ष दिले आहे. यांचे प्रमुख कारण मराठी भाषा वाचनसंस्कृती टिकवणे ती वाढविणे शिवसेना पक्षाचा प्रमुख अजेंडा आहे.

राज्यातील 11,700 शासनमान्य ग्रंथालय हा अजेंडा गेल्या अनेक वर्षापासून राबवत आहेत यांना सक्षम करण्याकरिता याकडे अधिक लक्ष देता यावे या हेतूने हेमंत  पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना राज्य ग्रंथालय सेलचा पहिला मेळावा येत्या 9 ऑक्टोबर रोजी मुंबई येथे होत आहे.

याचे उ‌द्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी उदय सामंत (उ‌द्योग मंत्री तथा माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री (ग्रंथालय)) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दीपक केसरकर (मराठी भाषा मंत्री),गुलाबराव पाटील (पाणीपुरवठा मंत्री),दादाजी भुसे (सार्वजनिक बांधकाम मंत्री), हेमंत पाटील (मंत्री), राजेश क्षीरसागर (मंत्री दर्जा),  संजय मोरे (सचिव), आनंदराव पाटील (मराठवाडा संपर्क प्रमुख), डॉ. राजू वाघमारे (प्रवक्ता शिवसेना), आ. यामिनी जाधव, आ. भावना गवळी, आ. बालाजी कल्याणकर प्रशांत पालांडे (संपर्कप्रमुख), विजय नाहटा (शिवसेना उपनेते तथा I.A.S. सेवानिवृत्त अधिकारी),बाबुराव कदम कोळीकर, माजी आमदार राम पांडागळे इत्यादींच्या उपस्थितीत हा मेळावा ‘नंदनवन’ मुख्यमंत्री यांचा बंगला, मलबारहिल येथे 9 ऑक्टोबर रोज बुधवार दुपारी 4 वाजता होत आहे. यावेळी ऑक्टोबर 2012 आघाडी सरकारने ग्रंथालय चळवळीच्या विकासाला स्थगिती देण्यारया निर्णय व या स्थगितीला ऑगस्ट 2022 रोजी महामहीम राज्यपाल महोदयांनी स्थगिती उठवल्यामुळे चळवळीच्या न्याय मागण्या पदरात पाडने युती सरकारमुळे सुरु झाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लवकरच आर्थिक मागणी मान्य करतील असा विश्वास जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भानवसे, साहेबराव सौदागर, सुदर्शन बुकन, रामचंद्र कदम, भरू खाडेकर, खंडेराव गलाडे, रामराजे जगताप, उत्तम भराडे, वैभव चौधरी, नंदाताई पुनगडे, मोहन गोरे, बापूराव जावळे, पांडुरंग डोलारे, भरत कदम, बापू भातलवडे, दिनकर टेकाळे, उत्तम शिंदे, संजय पवार, दीपक चेंडे, गोपाळराव यादव, संजय बडूरे, माणिक तिगाडे इत्यादी पदाधिकार्यांनी केला आहे. या मेळाव्यास हजारोच्या संख्येने सहभागी होण्याचे आव्हान संयोजक समितीने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *