विद्यार्थ्यांनी कृषी क्षेत्रातील नवीन ज्ञान प्राप्त करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा. -डॉ.प्रतापसिंह पाटील कृषी महाविद्यालयात नवीन विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न

विद्यार्थ्यांनी कृषी क्षेत्रातील नवीन ज्ञान प्राप्त करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा. -डॉ.प्रतापसिंह पाटील

कृषी महाविद्यालयात नवीन विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न

Spread the love

धाराशिव प्रतिनिधी – कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी कृषी क्षेत्रात येत असलेले नवनवीन तंत्रज्ञान अभ्यास करून त्या पद्धतीने आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना जागृत करण्याचे काम करावे असे प्रतिपादन धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष कृषी महाविद्यालय आळणी येथील नवीन विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभप्रसंगी बोलताना केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून धाराशिव शहरातील डॉ.लक्ष्मी स्वामी, डॉ.स्वामी टी. वाय. युवा सेना राज्य विस्तारक तथा नगरसेवक अक्षय ढोबळे,निखिल पाटील,आशिष पवार आणि पोलिस उपनिरीक्षक श्रीमती गीता हाके
इ. मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान बोलताना प्रमुख पाहुण्यांनी  कृषी क्षेत्र व भारताच्या आर्थिक दडणघडणीमध्ये कृषी क्षेत्राचे असलेले योगदान याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांकडून कृषी क्षेत्रामध्ये काही चांगले बदल होतील अशी अपेक्षा व्यक्त केले.

पुढे बोलताना डॉ.प्रतापसिंह पाटील  म्हणाले की, विद्यार्थ्यांनी चालू तंत्रज्ञान व बदलत्या जीवनशैलीनुसार आपल्या सर्वांगीण विकासासाठी योग्य ते प्रयत्न करावे व स्वतःबरोबरच आपल्या पालकांचे सभोवतालच्या शेतकऱ्यांचे व महाविद्यालयाचे नाव रोशन होईल असे काम पुढील चार वर्षात करावे. कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या काळात जास्तीत जास्त ज्ञान प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करावा असाही मौलिक सल्ला त्यांनी दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी प्राची देवकते व विद्यार्थी करण ढगे यांनी केले.सूत्रसंचालनाचे दिग्दर्शन करण्यासाठी प्रा. सुतार एन.एस. यांचे साह्य लाभले तसेच प्रा.डॉ.गांधले ए. ए. यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.क्रांतीकुमार पाटील, प्रा.पाटील एस.एन., प्रा.शेटे डी.एस., प्रा. दळवे एस. ए.,प्रा.माळी पी.पी.,प्रा.शिंदे ए. एस., प्रा.भालेकर एस.व्ही., प्रा.सोन्ने ए.एस. प्रा.दळवी व्ही.एम., प्रा. शेख एम. आर. प्रा. खोसे पी. जे. बनसोडे,एस.एस.महाविद्यालयाचे व्यवस्थापक प्रा.घाडगे एच. एस. तसेच कांबळे ए.बी., लिपिक महबूब मुजावर,रामचंद्र सुतार, श्रीमती कोरे,संदीप वीर,आकाश गिरी आणि तृतीय सत्रातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *