रुपामाता संचलित मुर्टा येथील दिग्विजय गुळ कारखान्याचे रोलर पूजन व ऊस उत्पादक मेळाव्याचे आयोजन

रुपामाता संचलित मुर्टा येथील दिग्विजय गुळ कारखान्याचे रोलर पूजन व ऊस उत्पादक मेळाव्याचे आयोजन

Spread the love

धाराशिव दि.४ (प्रतिनिधी) – रुपामाता उद्योग समूहाच्या अंतर्गत तुळजापूर तालुक्यातील मुर्टा येथील दिग्विजय एंटरप्राइजेस गुळ कारखान्याच्या २०२४ चे रोलर पूजन व ऊस उत्पादकांच्या मेळाव्याचे आयोजन रविवार दि.६ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे.

शेतकरी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करतात. मात्र उत्पादन म्हणजे उतारा कमी होत असल्यामुळे उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे एकरी १०० टन ऊस उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी नेमके कोणते तंत्र अवगत करावे ? या विषयी पुणे येथील वसंतदादा शुगर  इन्स्टिट्यूटचे मृदा शास्त्रज्ञ डॉ. समाधान सुरवसे, धाराशिव बार कौन्सिल असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. रविंद्र कदम व प्रगतिशील शेतकरी सत्यवान (भाऊ) सुरवसे हे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रूपामाता उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष ॲड व्यंकटराव गुंड पाडोळीकर हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास नळदुर्गसह तुळजापूर परिसरातील ऊस उत्पादक व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ॲड गुंड व गुळ कारखान्याचे चेअरमन विक्रम सुरवसे यांनी केले आहे.


रुपामाता उद्योग समूह धाराशिव -तुळजापूर संचलित दिग्विजय एंटरप्राइझेस गुळ कारखाना मुर्टी ता. तुळजापूर येथील 2024  हंगाम करिता रोल पूजन कार्यक्रम व एकरी शंभर टन ऊस उत्पादक वाढीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन व शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमासाठी वसंतदादा शुगर  इन्स्टिट्यूट पुणे येथील  मृदा शास्त्रज्ञ डॉ. समाधान सुरवसे, बार कौन्सिल असोसिएशन धाराशिव चे मा. अध्यक्ष अँड. रविंद्र कदम तसेच प्रगतिशील शेतकरी सत्यवान (भाऊ) सुरवसे मार्गदर्शन करणार आहे करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रुपमाता उद्योग समूहाचे प्रमुख प्रमोटर
अँड. व्यंकटराव गुंड पाडोळीकर असतील. अँड गुंड व गुळ कारखान्याचे चेअरमन विक्रम सुरवसे यांनी  या मेळाव्यासाठी नळदुर्ग- तुळजापूर परिसरातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *