सत्य ऐकायला या,शहरात शनिवारी adv.असीम सरोदे यांचे व्याख्यान

सत्य ऐकायला या,शहरात शनिवारी adv.असीम सरोदे यांचे व्याख्यान

Spread the love

धाराशिव (प्रतिनिधी) – आपल्या महाराष्ट्रा सारख्या थोर संताची आणि समाज सुधारकांची परंपरा लाभलेल्या, प्रगतशील राज्यात, गाव खेड्या पासून ते शहरा पर्यंत आज राजकीय, सामाजिक आणि आर्थिक दृष्टया अराजकतेची  परिस्थिती निर्माण झाली आहे. विविध जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण होऊन द्वेषाचे वातावरण पसरविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. महागाई, बेरोजगारी, अपुऱ्या शिक्षण आणि  आरोग्य सुविधे सोबतच शेतकरी आणि व्यापारी आत्महत्या चे प्रमाण वाढत आहे. व्यापारी, उद्योजक, कामगार, शासकीय नोकरदार ,दलित, अल्पसंख्याक, शेतकरी शेतमजूर ही संकटात सापडले आहेत. विशेष म्हणजे जनेतची आंदोलने दडपण्याची शासनकर्त्यांची दडपशाही बोकाळली आहे. तसेच कायद्याचा धाक न राहिल्याने मुली आणि महिलांवरील अत्याचार आणि असुरक्षिततेचे वातावरण वाढले आहे. असे अनेक गंभीर प्रश्न आपल्या  राज्यासमोर सध्या उभे आहेत.
लोकशाही व्यवस्थेमध्ये सरकारच्या कामकाजावर बारकाईने नजर ठेवून त्यांच्यावर जनतेचा अंकुश ठेवणे हे आपल्या सर्वांचे प्रमुख  कर्तव्य आहे. याचाच भाग म्हणून जाहीर व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन आपल्या शहरात केलेले आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने व्याख्यानास उपस्थित राहावे असे आवाहन प्रशांत नानासाहेब पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *