महाराष्ट्र राज्याचे सहप्रभारी माजी आ.कुणाल चौधरी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्नजिल्ह्यातील चारही जागा महाविकास आघाडी जिंकणार असल्याचा विश्वास

महाराष्ट्र राज्याचे सहप्रभारी माजी आ.कुणाल चौधरी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न

जिल्ह्यातील चारही जागा महाविकास आघाडी जिंकणार असल्याचा विश्वास

Spread the love

धाराशिव (प्रतिनिधी) – आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तथा महाराष्ट्र राज्याचे सहप्रभारी माजी आमदार कुणाल चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत कुणाल चौधरी यांनी धाराशिव जिल्ह्यातील चारही विधानसभा जागा या महाविकास आघाडी जिंकणार असल्याचा सर्वेच्या आधारे विश्वास व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी एकदिलाने कार्यरत राहावे येणारा काळ हा आपलाच असेल असा संदेश दिला. व्यासपीठावर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धीरज पाटील, माजी अध्यक्ष विश्वासराव शिंदे, प्रदेश सरचिटणीस डॉ.जितेंद्र देहाडे, सचिव फरीद देशमुख, मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने, वरिष्ठ उपाध्यक्ष सय्यद खलील सर, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, डॉ.स्मिता शहापुरकर, डिसीसी बँकेचे संचालक मेहबूब पाशा पटेल, धाराशिव तालुकाध्यक्ष विनोद वीर, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, उमरगा तालुकाध्यक्ष सुभाष राजोळे, विजयकुमार सोनवणे, सेवादल जिल्हाध्यक्ष विलास शाळू, बाजार समितीचे संचालक उमेश राजे निंबाळकर, महिला जिल्हाध्यक्ष ज्योती सपाटे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष आयुब पठाण, मागासवर्गीय जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे, ओबीसी जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत, माजी सभापती मुकुंद डोंगरे, माजी जि.प.सदस्य प्रकाश चव्हाण हजर होते.
यावेळी तुळजापूर आणि उमरगा या दोन्ही जागा काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढाव्यात व निष्ठावंत कार्यकर्त्यांस संधी द्यावी असा ठराव जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी मांडला यास सर्व उपस्थितांनी एकमताने अनुमोदन दिले.
यावेळी माजी अध्यक्ष विश्वासराव शिंदे यांनीही मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन राजाभाऊ शेरखाने यांनी केले तर आभार प्रशांत पाटील यांनी मानले.
बैठकीला ज्येष्ठ नेते उस्मान कुरेशी, जिल्हा सरचिटणीस अशोक बनसोडे, सरचिटणीस जावेद काझी, सचिव सुरेंद्रदादा पाटील, विजयकुमार वाघमारे, सचिव अनंत घोगरे, प्रभाकर लोंढे, विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष कफिल सय्यद, मानवाधिकार विभागाचे जिल्हाध्यक्ष अभिमान पेठे, युवा नेते अमोल कुतवळ, अनिलकुमार लबडे, महिला कार्याध्यक्ष तनुजा हेड्डा, सुवर्णा ढवळे,  अभिषेक बागल, शहाजी मुंडे सर, सुनील बडूरकर, मिलिंद गोवर्धन, विजय मुद्दे, सलमान शेख, प्रभाकर डोंबाळे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष स्वप्नील शिंगाडे, दादा गायकवाड, जिल्हा सचिव सौरभ गायकवाड, भारत काटे, संकेत पडवळ, बाबा घुटे, रोहित पडवळ, अश्रूबा माळी, संजय देशमुख, महादेव पेठे, भूषण देशमुख, संतोष पेठे, सचिन धाकतोडे, संजय गजधने, दिगंबर गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *