आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते शुभारभ

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते शुभारभ

Spread the love



धाराशिव (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजक्ता व नाविन्यता विभागा मार्फत आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र (ACKVK) चे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते दूरदृश्य प्रणाली द्वारे शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला. दूरदृष्टी प्रणालीद्वारे माननीय राज्यपाल डॉ. सी.पी. राधाकृष्णन, माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय केंद्रीय मंत्री तथा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीनजी गडकरी, माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. माननीय कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री माननीय श्री मंगल प्रभातजी लोढा यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. धाराशिव शहरात सदर कार्यक्रमाचे दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रक्षेपण करण्यात आले. बिल गेट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड मॅनेजमेंट महाविद्यालय, धाराशिव येथे आज दुपारी १२:३० वाजता कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. या कार्यक्रम स्थळी उपस्थित मान्यवर म्हणून श्रीलक्ष्मी सेवाभावी सामाजिक संस्था, हासेगाव (शि.) ता.कळंब च्या अध्यक्षा डॉ. सरोजनीताई संतोष राऊत या उपस्थित होत्या. तसेच श्री कुलस्वामिनी शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिव चे सचिव डॉ. रमेश विठ्ठलराव दाबके, बिल गेट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड मॅनेजमेंट धाराशिव चे प्राचार्य डॉक्टर अर्षद रजवी, सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, धाराशिव च्या संचालिका डॉ. वसुधा दिग्गज दापके-देशमुख, सह्याद्री कॉलेज ऑफ नर्सिंग धाराशिव चे प्राचार्य श्री बाळासाहेब बिरादार आदीं मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
     आचार्य चाणक्य कौशल विकास केंद्र मार्फत प्रतिवर्षी प्रत्येक महाविद्यालयात १५० युवक युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण दिले जाईल. वर्षभरामध्ये १५ ते ४५ वयोगटातील १ लाख ५० हजार युवक युवतींना मिळणार मोफत प्रशिक्षण.
     पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेअंतर्गत ५०० महिलांसाठी अर्थसहाय्य करण्याचे उद्दिष्ट आहे. प्रतिवर्षी प्रत्येक महाविद्यालयात १५० युवक-युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण दिले जाईल. वर्षभरात १५ ते ४५ वयोगटातील १ लाख ५० हजार युवक-युवतींना योजनेत मोफत प्रशिक्षण मिळणार आहे.
     धाराशिव मधल्या मदर कांचन इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड कम्प्युटर एप्लीकेशन धाराशिव, श्री स्वामी समर्थ आर्ट्स अँड सायन्स सीनियर कॉलेज रुईभर, छत्रपती संभाजी राजे जुनिअर कॉलेज बेंबळी, रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट कॉलेज ऑफ इंजीनियरिंग धाराशिव, बिल गेट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड मॅनेजमेंट, राजर्षी शाहू कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स धाराशिव, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर धाराशिव, उदय महाविद्यालय, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स तुळजापूर, श्री तुळजाभवानी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग तुळजापूर, कळंब तालुक्यातील साई कॉलेज ऑफ कम्प्युटर एज्युकेशन व विद्यानिकेतन हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येरमाळा, उमरगा तालुक्यातील भाऊसाहेब बिराजदार सीनियर कॉलेज बलसुर, श्रीकृष्ण महाविद्यालय गुंजोटी व तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसी, परंडा तालुक्यातील शिक्षण महर्षी गुरुवर्य आर.जी. शिंदे महाविद्यालय व एच.बी.पी. सोपान काका केळे आयटीआय कॉलेज केळेवाडी असे एकूण धाराशिव जिल्ह्यामध्ये 18 आचार्य कौशल्य विकास केंद्राचे शुभारंभ झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *