सरपंचाचे पद हे शेळीच्या शेपटासारख, माशाही हानता येईना आणि ढुंगणही झाकता येईना- शेतकरी पुत्र अण्णासाहेब

सरपंचाचे पद हे शेळीच्या शेपटासारख, माशाही हानता येईना आणि ढुंगणही झाकता येईना- शेतकरी पुत्र अण्णासाहेब

Spread the love

धाराशिव (प्रतिनिधी) – तुळजापूर मतदारसंघात 5 सप्टेंबर पासून अण्णासाहेब दराडे यांनी काढलेली यात्रा गावोगावी मुक्कामी फिरत असून ही यात्रा शुक्रवारी पाच तारखेला संध्याकाळी बोरगाव येथे नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आलेली होती.

प्रत्येक गावच्या सरपंचाची अशीच अवस्था आहे की गावचा विकास करण्याची गावात काम करण्याची त्यांची इच्छा असून सुद्धा कामे मंजूर करून आणण्यासाठी टक्केवारी दिल्याशिवाय कामे मिळत नाहीत आणि मिळाली तरी ती पूर्ण करण्यासाठी खालपासून वरपर्यंत टक्केवारी गेल्याशिवाय ती काम पूर्ण होऊ शकत नाहीत.
गावात विकास कामे करायचं म्हणलं की पदर पैशाने आधी वरच्या लोकांच भागवाव लागत, त्याशिवाय काम करता येत नाहीत. आई खाऊ देईना आणि बाप भीक मागू देईना अशीच अवस्था गावोगावीच्या सरपंचाची आहे.

तालुक्याला जर चांगलं नेतृत्व उभा राहिलं तर खऱ्या अर्थाने सरपंचाची ही गोची आहे ती कायमची सुटू शकते. कुणालाही टक्केवारी द्यायची गरज नाही पडली तर गावचा सरपंच हा व्यवस्थितपणे गावची कामे करू शकेल आणि त्याला गावचा विकास करण्यासाठी पूर्णपणे स्वतंत्र्य सुद्धा मिळू शकेल. गावगाडा चालवणं सोपं काम नाही, खरंतर सरपंच हे जबाबदारी कशी पार पाडतात हे त्यांच्या जीवाला आणि देवालाच माहिती असावं.

सरपंचांनी चांगल्या नेतृत्वाला जर साथ दिली तर भविष्यामध्ये तालुक्यातील सर्व गावांचा भरभरून विकास सर्वांनी एकत्र येऊन करता येऊ शकतो असे सूतोवाच अण्णासाहेब दराडे यांनी बोरगाव येथे नागरिकांशी बोलताना व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *