सावंत यांच्या घरासमोर गोळीबार करुन दहशत माजविण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर कठोर कारवाई कराशिवसैनिकांचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

सावंत यांच्या घरासमोर गोळीबार करुन दहशत माजविण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर कठोर कारवाई करा

शिवसैनिकांचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

Spread the love



धाराशिव-जिल्ह्याचे पालकमंत्री मा.डॉ.तानाजीराव सावंत यांचे पुतणे, जिल्हा परिषदेचे मा.जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबार करणार्‍यांना तात्काळ अटक करावी तसेच या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसैनिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा मा.डॉ.तानाजीराव सावंत यांचे पुतणे, जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या सोनारी (ता.परंडा) येथील घरासमोर गुरुवारी मध्यरात्री दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात दोन व्यक्तींनी गोळीबार करुन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला.

वास्तविक महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा.एकनाथजी शिंदे हे परंडा तालुक्याच्या दौर्‍यावर शनिवार, 14 सप्टेंबर रोजी येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत परंडा येथे भव्य सभा आयोजित करण्यात आलेली आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर गोळीबार करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न समाजकंटकांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून गोळीबार करणार्‍या व्यक्तींना तात्काळ अटक करावी. तसेच मुख्यमंत्री महोदयांच्या दौराकाळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याचीही पोलीस प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशी मागणी शिवसैनिकांच्या वतीने करण्यात आली आहे.

निवेदनावर शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज राजाभाऊ साळुंके, संपर्कप्रमुख अनिल खोचरे, तालुकाप्रमुख अजित लाकाळ, शिवउद्योग सेना जिल्हाप्रमुख सुनील शेरखाने, शिवउद्योग सेना महिला जिल्हाप्रमुख सुवर्णमाला सतीश पाटील, व्हीजेएनटी विभाग जिल्हाप्रमुख कमलाकर दाणे, रजनीकांत मळाळे, जेके काझी, अभिजित देडे, युवासेना शहरप्रमुख रोहीत कदम, शमसोद्दीन शेख, प्रवीण पवार, रामेश्वर गोफणे, दत्ताभाऊ तिवारी, ज्ञानेश्वर उंबरे, सुमित गायकवाड, आबा देवकते, ज्ञानेश्वर ठेवरे, शुभम पांढरे, सागर कदम, आदींची स्वाक्षरी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *