आतापर्यंत अणदूर च्या अण्णाना साथ दिलीत आता हगलूर च्या अण्णाला आशीर्वाद द्या – आण्णासाहेब दराडे.

आतापर्यंत अणदूर च्या अण्णाना साथ दिलीत आता हगलूर च्या अण्णाला आशीर्वाद द्या – आण्णासाहेब दराडे.

Spread the love

तुळजापूर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार आण्णासाहेब दराडे यांची चित्ररथ यात्रेला सुरूवात झाली आहे.ही चित्ररथ यात्रा रविवारी रात्री चिकुंद्रा येथे मुक्कामी होती. सोमवारी सकाळी ग्रामस्थांच्या उपस्थितीत आण्णासाहेब दराडे यांनी सर्वांशी संवाद साधला.तलाठी कार्यालयात होत असलेली पिळवणूक,आरोग्य सुविधेचा अभाव, तसेच शेतरस्त्याच्या अडचणी अश्या विविध प्रश्नावर भाष्य करत आतापर्यंत चुकुंद्रा ग्रामस्थांनी अणदूर च्या अण्णांना साथ दिलीत आता हगलूर च्या अण्णाला आशीर्वाद द्या असे भावनिक आवाहन केले. तसेच उजनी धरणातून आणलेल्या पाण्याने मारुतीला अभिषेक करण्यात आला..
यात्रेत असणाऱ्या सर्वांच्या जेवणाची व्यवस्था केशर जाधवर यांच्याकडून करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *