गेल्या तीन महिन्यांपासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची पगार करण्याचे आदेश द्यावे या मागणीसाठी महाराष्ट्र कर्मचारी ग्रामपंचायत युनियनचे उपमुख्य कार्यकारी यांना निवेदन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची मागील 3 महिन्यापासून मोठ्या प्रमाणात उपासमारग्रामपंचायत अधिकारी ते जिल्हा परिषद पर्यंत प्रत्येक अधिकाऱ्याची 3 महिन्यापासून कर्मचाऱ्यांना टोलावा टोलवी ची उत्तरे

गेल्या तीन महिन्यांपासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची पगार करण्याचे आदेश द्यावे या मागणीसाठी महाराष्ट्र कर्मचारी ग्रामपंचायत युनियनचे उपमुख्य कार्यकारी यांना निवेदन

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची मागील 3 महिन्यापासून मोठ्या प्रमाणात उपासमार

ग्रामपंचायत अधिकारी ते जिल्हा परिषद पर्यंत प्रत्येक अधिकाऱ्याची 3 महिन्यापासून कर्मचाऱ्यांना टोलावा टोलवी ची उत्तरे

Spread the love



धाराशिव दि.19 (प्रतिनिधी) -मागील तीन महिन्यांपासून राहिलेग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन मिळावे यासाठी यासाठी महाराष्ट्र कर्मचारी ग्रामपंचायत युनियनाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना महाराष्ट्र कर्मचारी ग्रामपंचायत युनियनाने निवेदन दिले आहे.या निवेदनात म्हटले आहे की  निवासी उपजिल्हाअधिकारी धाराशिव यांनी दिलेल्या आदेशानुसार ही जिल्हा परिषद धाराशिव चे अधिकारी कार्यवाही करण्यास तयार नाहीत. धाराशिव तालुक्यातील गावापातळीवर अगदी 24 तास गावासाठी झटून काम करणारे ग्रामपंचायत कर्मचारी आज रोजी मोठ्या संकटात आहेत. ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या पगारीसाठी ग्रामपंचायत  कर्मचारी युनियन संघटना मार्फत वेळो वेळी जिल्हा अधिकारी कार्यालय, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, यांना पत्रव्यवहार करूनही कर्मचारी वर्गाचे मानधन मिळत नाही. पंचायत समिती, जिल्हा परिषद वरिष्ठ अधिकारी कोणत्याही प्रकारचे सहकार्य करण्यास ग्रामपंचायत कर्मचारी यांचे मानधन देण्यास व वरिष्ठ लेव्हल वरून काम करण्यास तयार नाही. संघटनेस सतत टोलवा तोलविचि उत्तरे देत आहेत. एवढेच नाही तर ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने धाराशिव तालुक्यातील सर्व प्रशासकीय कार्यालयात ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या अडचणी बाबत दि. 9.07.2024 रोजी पत्र दिले होते. सदरील पत्रानुसार निवासी उपजिल्हाअधिकारी धाराशिव यांनी उपमुख्य कार्यकारी ग्रामपंचायत विभाग यांना लेखी स्वरूपात दि. 25/07/2024 रोजी आदेश देखील काढले होते. परंतु जिल्हा परिषद मार्फत कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. दि. 05/08/2024 रोजी वरिष्ठ कार्यालय सचिन शि. घाडगे साहेब, संचालक, पंचायत राज महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्फत धाराशिव तालुक्यातील कर्मचारी मानधन व सरपंच उपसरपंच यांच्या मानधनासाठी धाराशिव जिल्यासाठी एकूण 23885424 रु एवढा निधी जिल्हा परिषद च्या खात्यावर ग्रामपंचायत कर्मचारी यांना खात्यावर जमा करण्यासाठी जमा करण्यात आली असून देखील जिल्हा परिषद मार्फत निधी ग्रामपंचायत यांच्या खात्यावर जमा करण्यास अधिकारी टाळाटाळ करत आहेत. सध्या सनसुधी च्या काळातही ग्रामपंचायत कर्मचारी यांची उपासमार होत आहे. या निवेदनावर तालुक्यध्याक्ष अंकुश शिंदे उपाध्यक्ष पांडुरंग रणदिवे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *