बांधकाम कामगारांची होणार तपासणी व उपचारफिरत्या वैद्यकीय कक्षाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

बांधकाम कामगारांची होणार तपासणी व उपचार

फिरत्या वैद्यकीय कक्षाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Spread the love


धाराशिव दि.19 (धाराशिव)  जिल्हयातील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदनीकृत बांधकाम कामगारांना तपासणी ते उपचार आरोग्य योजनेचा शुभारंभ पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या हस्ते 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात फिरत्या वैद्यकीय कक्ष वाहनाची फित कापून व हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,पोलीस अधीक्षक संजय जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास व सरकारी कामगार अधिकारी सुधाकर कोनाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातंर्गत येणाऱ्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापित करण्यात आले आहे.या मंडळाने नियुक्त केलेल्या हिंद लॅब या कंपनीमार्फत तपासणी ते उपचार आरोग्य योजनेतंर्गत अत्याधुनिक जीवन समर्थन प्रणालीयुक्त फिरते वैद्यकीय कक्ष(Mobile Medical Unit) कार्यरत करण्यात आले आहे.

या योजने अंतर्गत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटूंबातील पती अथवा पत्नी व 10 वर्षावरील प्रथम दोन अपत्ये लाभार्थी म्हणून राहतील.  बांधकाम कामगार हा नोंदणी कालावधीमध्ये वर्षातून एकदा योजनेच्या लाभासाठी पात्र राहील.

नोंदीत बांधकाम कामगारांची प्राथमिक आरोग्य तपासणी,चाचणी केल्यानंतर कामगारास जीवितास धोका निर्माण करणारा आजार असेल तर त्या आजारावर आवश्यक उपचार तपासणी ते उपचार या योजनेतंर्गत करण्यात येणार आहेत.या योजनेचा लाभ जिल्हयातील जास्तीत जास्त नोंदीत बांधकाम कामगारांनी घ्यावा.असे आवाहन पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *