
एन एम एम एस परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बरमगाव बुद्रुकचे घवघवीत यश
धाराशिव (प्रतिनिधी) – तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बरमगाव बुद्रुक येथील विद्यार्थ्यांनी सन 2024-25 च्या एन एम एम एस (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती) परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे.
शाळेतील कुमारी सिरसाठे राजनंदिनी, सिरसाठे आम्रपाली, गायकवाड सिद्धी आणि डावकरे कार्तिक यांनी या परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केली. या विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या प्रांगणात विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्यात शालेय शिक्षण समिती अध्यक्ष यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक चंद्रकांत मोरे सर यांचाही गौरव करण्यात आला.
या उल्लेखनीय यशाबद्दल गावात सर्वत्र आनंदाचे वातावरण असून, शाळेतील शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.


