
नमा अशा किरण सेवाभावी संस्थेचे सांजा गावात साहित्य वाटप
धाराशिव (प्रतिनिधी)- सांजा गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये नमा अशा किरण सेवाभावी संस्थेच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात आले. ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती आणि शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना महत्त्वपूर्ण साहित्य वितरित करण्यात आले.
संस्थेच्या वतीने शाळेसाठी एक लाख रुपये किमतीचे 250 लिटर/तास क्षमतेचे जलशुद्धीकरण यंत्र बसवण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना 35,000 रुपयांचे क्रीडा साहित्य आणि 500 अवांतर वाचनाची पुस्तके बाल वाचनालयासाठी देण्यात आली. यासोबतच 13 दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम पाय, तसेच श्रवणदोष असलेल्या नागरिकांना श्रवणयंत्र वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष सिद्धार्थ बांगर, कॅशियर मल्लप्पा सर, सदस्य हरिदास माने, जिल्हा परिषद डेप्युटी इंजिनिअर काळेसाहेब, वैद्यकीय अधिकारी तेरकर मॅडम, ग्रामसेवक एकनाथ माने, जि.प. इंजिनिअर आवड साहेब, तसेच शाळेतील शिक्षक पडवळ सर, पाटील सर व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. याशिवाय ग्रामपंचायत उपसरपंच सतीश सूर्यवंशी, सदस्य राजदीप गायकवाड, राकेश कचरे, प्रवीण जकाते, हरी इंगळे, अमर शिंदे यांनीही सहभाग घेतला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रणजीत कदम सर व राकेश सूर्यवंशी यांनी विशेष मेहनत घेतली. सूत्रसंचालन उंबरे सर यांनी केले तर आभार मारुती कदम यांनी मानले.
सदर उपक्रमामुळे सांजा गावातील नागरिक आणि विद्यार्थी यांना मोठा लाभ होणार आहे.

