तुळजापूर येथे एमडी ड्रग्स विक्री करणारे इसम जेरबंदतामलवाडी पोलिसांची आणि स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई

तुळजापूर येथे एमडी ड्रग्स विक्री करणारे इसम जेरबंद

तामलवाडी पोलिसांची आणि स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई

Spread the love

धाराशिव : स्थानिक गुन्हे शाखा आणि तामलवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्त कारवाई करत तुळजापूर येथे एमडी ड्रग्स विक्रीसाठी आणणाऱ्या तिघांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून 2.5 लाख रुपये किमतीच्या 59 पुड्या एमडी ड्रग्ससह एकूण 10.75 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सुदर्शन कासार आणि त्यांच्या पथकाने तुळजापूर उपविभागात गस्त घालत असताना गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

संशयित कार आणि आरोपी ताब्यात

सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील तामलवाडी टोल नाक्याजवळ एक मोटार कार संशयास्पदरीत्या उभी असल्याचे आढळले. पोलीस पथकाने गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे, युवराज देविदास दळवी (दोघे रा. तुळजापूर) आणि संदीप संजय राठोड (रा. नळदुर्ग) हे तिघे इसम आढळून आले.

चौकशीदरम्यान त्यांनी एमडी ड्रग्स मुंबईहून विक्रीसाठी तुळजापूर येथे आणल्याचे कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून 59 पुड्या एमडी ड्रग्स (किंमत – ₹2,50,000), गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि मोबाईल असा एकूण ₹10,75,000 किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

या प्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

यशस्वी कारवाई करणारे पोलीस पथक

ही कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक श्री. गोहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानीय गुन्हे शाखेचे सपोनि सुदर्शन कासार, तामलवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि गोकुळ ठाकुर, पोउपनि लोंढे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी शौकत पठाण, प्रकाश औताडे, फहरान पठाण, जावेद काझी, रत्नदिप डोंगरे, नितीन भोसले तसेच तामलवाडी पोलीस ठाण्याचे अंमलदार माने, सलगर, सुरनर, चौगुले व चालक शेख यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *