
गुन्हा दाखल करण्याचे गट विकास अधिकाऱ्यांचे आदेश!
कसबे तडवळे ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरण…
ग्रामपंचायतचा अभिलेख चोरीलाच…
१२५च्या आजींना दाखवले होते कामावर…
ठपका तिघांवर, कारवाई मात्र एकावर,
कसबे तडवळे – गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात चर्चेत असलेल्या कसबे तडवळे ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरणी (मनरेगा) ७ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्याचे आदेश धाराशिव पंचायत समिती चे गटविकास अधिकारी आर. व्ही. चकोर यांनी ग्रामपंचायत अधिकारी संजय आडे यांना दिले आहेत.
तक्रारदार किशोर कदम यांच्या तक्रारीच्या अनुषंगाणे कसबे तडवळे येथे सन २०२०-२१ ते २०२२ -२३ या वर्षांमध्ये तत्कालीन सरपंच,ग्रामसेवक,व ग्रामरोजगार सेवक यांनी संगणमत करून गावातील रोजगार हमी योजनेच्या कामात व गावातील १२५आजींना कामावर असल्याचे दाखवून शासकीय नियमाचे उल्लंघन करून त्यांना कामावर हजर असल्याचे दाखवून अपहार केलेला असल्याचे दिसून आले असून या सर्व संबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश ग्रामपंचायत अधिकारी संजय आडे यांना दिले आहेत. परंतु या अहवालत संबंधित ग्रामसेवक, सरपंच, ग्रामरोजगार सेवक हे तिघे दोषी असताना केवळ ग्रामरोजगार सेवक यांच्यावरच कारवाई का असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणास जबाबदार असलेले तत्कालीन ग्रामसेवक एस. डी. राठोड यांना केवळ करणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
सदर प्रकरणी संबंधित दोषींवर कारवाई करण्यासाठी सर्व अभिलेख जमा करण्याचे आदेश ग्रामरोजगार सेवक चंदू भालेराव यांना दिले होते.
परंतु सर्व गहाळ अभिलेख विहित वेळेत पंचायत समिती कार्यालयात जमा न केल्याने अभिलेख व्यस्थापन कायद्यातर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश धाराशिव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. आर. व्ही. चकोर यांनी दिले आहेत.