केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते रुपाली अंकुशराव सन्मानित

केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते रुपाली अंकुशराव सन्मानित

Spread the love



धाराशिव (प्रतिनिधी) – प्रजासत्ताक दिनी महिला बालकल्याण केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी व दिल्लीच्या राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांच्या हस्ते रूपाली नितीन अंकुशराव यांचा प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
धाराशिव तालुक्यातील कौडगाव येथील अंगणवाडी सेविका रूपाली अंकुशराव यांची प्रजासत्ताक दिनासाठी जिल्ह्यातून एकमेव निवड करण्यात आली होती. दिल्ली येथील समारंभात अंकुशराव यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी महिला बालकल्याण विभागाचे आयुक्त कैलास पगारे, उपायुक्त उज्वला पाटील आदींसह अधिकारी उपस्थित होते. याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनक घोष, महिला बालविकास विभागाचे देवदत्त गिरी, प्रकल्प अधिकारी सविता देशमुख, विस्तार अधिकारी किशोर वंजारवाडकर, सुपरवायझर वंदना सुकाळे, कनिष्ठ सहाय्यक ययाखान पठाण यांनी अभिनंदन केले आहे. याबद्दल अंकुशराव यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *