शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब येथे संविधान मंदिराचा उद्घाटन समारंभ संपन्नभक्कम लोकशाही करिता संविधानाचा जागर घरोघरी व्हावा-कौशल्य विकास व नाविन्यता विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष राऊत

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब येथे संविधान मंदिराचा उद्घाटन समारंभ संपन्न

भक्कम लोकशाही करिता संविधानाचा जागर घरोघरी व्हावा-कौशल्य विकास व नाविन्यता विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष राऊत

Spread the love

कळंब- भक्कम लोकशाही करिता संविधानाचा जागर घरोघरी व्हावा असे प्रतिपादन कौशल्य विकास व नाविन्यता विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष राऊत यांनी शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था कळंब येथील संविधान मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमात केले.
    सामाजिक न्यायाची खरी शिकवण ही भारताच्या संविधानातुन प्राप्त होत असल्यामुळे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग अंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील राज्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालयामध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षनार्थीना सामाजिक न्यायाची खरी शिकवण मिळावी यासाठी मा. ना. मंगल प्रभात लोढा, मंत्री, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्या संकल्पनेतून राज्यातील ४३४ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालयामध्ये संविधान मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे.
      या   संविधान मंदिराचे उद्घाटन मा. उपराष्ट्रपती जयदीप धनखड  यांच्या शुभ हस्ते आज दिनांक १५ सप्टेंम्बर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाइन पद्धतीने झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था कळंबचे प्राचार्य केशव पवार हे होते तर विशेष उपस्थिती म्हणून कौशल्य विकास व नाविन्यता विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष राऊत हे होते. प्रमूख पाहुणे म्हणून डी. एस. लांडगे, उपशिक्षणाधिकारी, आयमसी सदस्य जी बी करडे, पी बी झोरी, आर एम कापसे, श्रीकांत खारके, वैभवराज फाटक,श्रीमती आशा राऊत, सूरज भांडे, महादेव आडसुळ, सुभाष घोडके, सी आर घाडगे, बंडू ताटे, प्रकाश भडंगे, अविनाश घोडके, नवनाथ भंडारे, ज्येष्ठ पत्रकार माधवसिंग राजपूत, पत्रकार मंगेश यादव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिल्पनिदेशक अंकूश माळकर, वसंत टोपे यांनी केले. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी संस्थेचे प्राचार्य केशव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गटनिदेशक शामकांत डोंगे, शिल्पनिदेशक लक्ष्मण निर्मळ, सुजित दंडनाईक, मंचक जाधव, धैर्यशील मडके, नदीम शेख, एस एस कुट्वाड, अक्षय सुतार, कल्लेश भोसले, बालाजी पांचाळ, शिल्पनिदेशिका रंजना फुलारी, गोदावरी वडजकर, ज्योती शिंदे, कोमल मेंडके, वरीष्ठ लिपिक विलास सुरवसे, भांडारपाल बाजीराव राऊत, लिपिक महेश सौलाखे, राहुल माळकर, चतुर्थ श्रेणी कर्मचारी पप्पू मडके, फरजाना शेख यांच्यासोबत सर्व प्रशिक्षणार्थी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *