राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार तर्फे  साहेब शिस्तबद्ध गणेश विसर्जन मिरवणूक स्पर्धा 2023 बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार तर्फे  साहेब शिस्तबद्ध गणेश विसर्जन मिरवणूक स्पर्धा 2023 बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न

Spread the love

धाराशिव (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार तर्फे गेल्यावर्षी घेण्यात आलेल्या साहेब शिस्तबद्ध गणेश विसर्जन मिरवणूक स्पर्धा 2023 बक्षीस वितरण आज रोमा येथील फंक्शन हॉलमध्ये पार पडले गणेश विसर्जन मिरवणूक स्पर्धा २०२३ चे प्रथम पारितोषिक श्री गणेश मंडळ गणेश नगर धाराशिव यांना एकवीस हजार रुपये रोख तसेच स्मृतीचिन्ह हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते संजय मामा निंबाळकर यांच्यातर्फे देण्यात आले ,द्वितीय क्रमांक आजोबा गणेश मंडळ जुनी गल्ली धाराशिव यांना रोख पंधरा हजार रुपये व स्मृतिचिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रताप भैया पाटील यांच्या तर्फे देण्यातआले, तसेच तृतीय क्रमांकाचे पारितोषिक हे चक्रधर तरुण गणेश मंडळ झोरी गल्ली धाराशिव व हिंगलाज माता तरुण गणेश मंडळ जुना बस डेपो धाराशिव यांच्यात अनुक्रमे प्रत्येकी पाच हजार पाचशे रुपये रोख व स्मृतिचिन्ह अशी विभागून देण्यात आले बक्षिस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष शेखर घोडके यांच्यातर्फे देण्यात आले , तसेच
बेस्ट थीम हे उत्तेजनार्थ पारितोषिक ग्रीन समता गणेश मंडळ समता नगर धाराशिव यांना रोख तीन हजार रुपये व स्मृतीचिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नगरसेवक बाबा मुजावर यांच्यातर्फे देण्यात आले ,बेस्ट ग्रुप ऑफ ड्रेसिंग पारितोषिक जय मल्हार गणेश मंडळ देवकते गल्ली धाराशिव यांना रोख तीन हजार रुपये व स्मृतिचिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत देशमुख यांच्यातर्फे देण्यात आले, बेस्ट ग्रुप हे उत्तेजनार्थ पारितोषिक रोख तीन हजार रुपये स्मृतीचिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नगरसेवक बाबा इस्माईल यांच्यातर्फे देण्यात आले ,तसेच बेस्ट कोरिओग्राफी हे उत्तेजनार्थ पारितोषिक विशालजी टोले सर यांना रोख तीन हजार रुपये व स्मृतिचिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे पंकज भोसले यांच्यातर्फे देण्यात आले
त्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते संजय मामा निंबाळकर, मसूद भाई शेख, कादर खान भाई, वाजिद भाई पठाण,शहराध्यक्ष बबलू भाई शेख, पंकज भोसले युवक जिल्हाध्यक्ष शेखर घोडके, पदवीधर जिल्हाध्यक्ष रणजीत वर्पे, युवक शहराध्यक्ष रणवीर इंगळे जयंत देशमुख, पलू काकडे ,अन्वर भाई शेख, बिलाल भाई तांबोळी, रवी ठेंगल ,योगेश सोन्ने, युवक तालुकाध्यक्ष अमर गुंड, तालुका युवक सरचिटणीस सुरज वडवले ,शशिकांत पवार, कुणाल कर्णवर, ओंकार गपाट तसेच इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षातर्फे सर्व विजेत्या गणेश मंडळांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या व दरवर्षी यापेक्षा सरस आणि यापेक्षा चांगल्या मिरवणुका काढण्याचे आवाहन केले व ही बक्षिसाची परंपरा कायम ठेवणार अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षातर्फे ग्वाही देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *