औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तंत्र प्रशालेत संविधान मंदिर उद्घाटन सोहळा

औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तंत्र प्रशालेत संविधान मंदिर उद्घाटन सोहळा

Spread the love



धाराशिव जागतिक लोकशाही दिनानिमित्त आज दि. १५ सप्टेंबर २०२४ रोजी महाराष्ट्रातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था  व शासकीय तंत्र प्रशालेत संविधान मंदिराचे उ‌द्घाटन मा. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते (अभासी पध्दतीने) करण्यात आले.
शासकीय तंत्र प्रशाला केंद्र, धाराशिव येथील संविधान मंदिराचे उद्घाटन धाराशिव जिल्हा व्यवसाय व शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रवीण जे. औताडे यांच्या हस्ते व प्रमुख पाहुणे अविनाश पोफळे (पत्रकार सकाळ) यांच्या उपस्थितीत संप्पन झाले.  यावेळी धाराशिव नगरीतील ज्येष्ठ नागरीक श्री. माने, श्री. देशमुख, श्री. जाधव आणि धाराशिव प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचनाकेंद्राचे का.अधिक्षक एम.जी.पिसे यांची उपस्थिती होती.
सदरील कार्यक्रमास शासकीय तंत्र प्रशाला, केंद्र धाराशिव व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय धाराशिव येथील सर्व कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच विविध शाळामधील विद्यार्थी देखील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *