श्री सिद्धीविनायक मल्टीस्टेट सहकार गौरव सर्वोत्कृष्ट संस्था सन २०२२-२३ पुरस्काराने सन्मानित..काल दिनांक १२ सप्टेंबर २०२४ रोजी शिर्डी येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला.

श्री सिद्धीविनायक मल्टीस्टेट सहकार गौरव सर्वोत्कृष्ट संस्था सन २०२२-२३ पुरस्काराने सन्मानित..

काल दिनांक १२ सप्टेंबर २०२४ रोजी शिर्डी येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला.

Spread the love



राष्ट्रीय फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट द्वारे सहकार क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या संस्थांना हा पुरस्कार दिला जातो.

भारत सरकारच्या सहकार खात्याचे सचिव मा.श्री.आशीष भुतानी यांच्या हस्ते संस्थेचे चेरमन श्री. दिनेश कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री मा.श्री.सुभाषबापु देशमुख, सहकार खात्याचे नाशिकचे विभागीय निबंधक संभाजीराव निकम, महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह क्रेडिट फेडरेशनचे चेअरमन मा.श्री.काकासाहेब कोयटे, फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट को.ऑप क्रेडिट सोसायटीचे चेअरमन मा.श्री.सुरेश वाबळे, बुलढाणा अर्बन मल्टिस्टेटचे चेअरमन राधेश्याम चांडक, अहमदनरचे जिल्हा उपनिबंधक श्री.गणेश पुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.राजकुमार जाधव,श्री सिध्दीविनायक जिल्हा पतसंस्थेचे चेअरमन श्री.गणेशजी कामटे,अति.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अरविंद गोरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *