मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी’ योजनेचा जास्तीत जास्त बहिणींना लाभ मिळवून देण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांचे प्रयत्न यशस्वीऐन रक्षाबंधन काळात बँक खात्यात दोन हप्ते जमा झाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण

मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी’ योजनेचा जास्तीत जास्त बहिणींना लाभ मिळवून देण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांचे प्रयत्न यशस्वी

ऐन रक्षाबंधन काळात बँक खात्यात दोन हप्ते जमा झाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण

Spread the love



धाराशिव- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील महायुती सरकारने राज्यातील महिला भगिनींसाठी सुरु केलेल्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी’ योजनेचा जास्तीत जास्त बहिणींना लाभ मिळवून देण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी केलेले प्रयत्न यशस्वी ठरले आहेत. ऐन रक्षा बंधनाच्या काळात लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात दरमहा प्रत्येकी 1500 रुपये असे दोन हप्त्याचे 3000 रुपये जमा झाल्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

महायुती सरकारचे मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस, श्री.अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील महिला भगिनींसाठी मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी ही योजना सुरु केली. या योजनेसाठी पात्र असलेली कोणतीही महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी शिवसेनेचे धाराशिव जिल्हाप्रमुख श्री.सुरज साळुंके यांनी धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी मेळावे घेऊन महिला भगिनींना योजनेसाठी अर्ज कसा भरावा याबाबत स्वतः उपस्थित राहून मार्गदर्शन केेले. मेळाव्यांमध्ये शिवसैनिकांच्या मदतीने महिला भगिनींचे अर्ज भरुन घेऊन संबंधित यंत्रणेकडे सुपुर्द केले. याचा धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघातील हजारो पात्र महिला भगिनींना लाभ मिळाला आहे. पात्र महिला भगिनींच्या बँक खात्यात दोन महिन्याचे प्रत्येकी 1500 रुपये प्रमाणे 3000 रुपये थेट जमा झाले आहेत. ऐन सणासुदीत ही रक्कम मिळाल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. योजनेचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करीत असलेले शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.सुरज साळुंके यांचे लाडक्या बहिणींनी राखी बांधून औक्षण करत मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांचेही आभार व्यक्त केले.

विशेष म्हणजे धाराशिव तालुक्यातील सोनेगाव येथील लाडक्या बहिणींनी तर मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांच्यावर एक गीत तयार करुन लाडक्या भावाचे कौतुक केले. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ मुख्यमंत्री झाला.. लाडक्या बहिणींची काळजी त्याला.. अन् आणली मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण योजना.. लाडक्या भाच्चीलाही न्याय द्यावा.. अशा गीत रचनेतून त्यांनी सरकारच्या या योजनेचे महिलांच्या आर्थिक सक्षमतेसाठीचे महत्त्व स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यात जवळपास 3 लक्ष 24 हजारपेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे पात्र लाभार्थी महिलांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया गतिमान होण्यासाठी प्रशासनाच्या बरोबरीने शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.सुरज साळुंके यांनी प्रयत्न केले. अद्यापही ज्या महिला भगिनींना लाभ मिळालेला नाही. त्यांच्या अर्जाची दुरुस्ती व इतर त्रुटींबाबत ते मार्गदर्शन करत आहेत. रक्षाबंधन सणापर्यंत धाराशिव जिल्ह्यातील 1 लाख 79 हजार 911 महिलांनी या योजनेचा लाभ मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज नारीशक्ती अ‍ॅपवर केले होते. तर 1 लाख 28 हजार 817 अर्ज संकेतस्थळावर असे एकूण 3 लाख 8 हजार 728 प्राप्त झाले. सध्या ज्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही, त्यांनी बँक खात्याची पडताळणी, केवायसी अथवा इतर त्रुटींची दुरुस्ती करण्याचे काम वेगात सुरु आहे. त्यामुळे आणखी जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *