बालनाट्य, परिसंवाद, लोककला आणि तमाशाने भारावले रसिक  शिट्ट्या,टाळ्या आणि वन्स मोअरने दणाणले सभागृह

बालनाट्य, परिसंवाद, लोककला आणि तमाशाने भारावले रसिक 

शिट्ट्या,टाळ्या आणि वन्स मोअरने दणाणले सभागृह

Spread the love

 


धाराशिव : ‘या रावजी तुम्ही बसा भावजी…’, पोटासाठी नाचते मी.. पर्वा कुणाची,  इचार काय हाय तुमचा हो पाव्हणं इचार काय हाय तुमचा?अशा वैविध्यपूर्ण ठसकेबाज लावण्या लोकनाट्य तमाशा  मंडळाच्या  सहकलाकारांनी सादर केल्या. शंभरव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त सांस्कृतिक महोत्सवात  बालनाट्य, परिसंवाद, लोककला आणि तमाशाने रसिक भारावले. शिट्ट्या,टाळ्या आणि वन्स मोर च्या गजरात उत्स्फूर्त प्रतिसाद देत सभागृह दणाणले.


१०० व्या नाट्य संमेलनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा धाराशिव यांच्यावतीने सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन 15 ते 18 ऑगस्ट दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात करण्यात आले आहे.या महोत्सवाच्या  दुसऱ्या दिवशी प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते नटराजाचे पूजन करून,  पुष्पहार अर्पण करून व सिने अभिनेते दिवंगत विजय कदम यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी महोत्सवाचे स्वागताध्यक्ष मा.धनंजय (नाना) शिंगाडे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नियामक मंडळाचे सदस्य विशाल शिंगाडे, नियामक मंडळाचे सदस्य नंदू कवाळकर, शाखेचे सल्लागार डॉ. अभय शहापूरकर, डॉ.राजकुमार मुसने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय दुधगावकर, उद्योजक सुमित कोठारी , उपस्थित होते.




तमाशा या  कार्यक्रमामध्ये  महादेव मनवकर लोकनाट्य तमाशा मंडळ मनव तालुका कराड जि. सातारा यांनी आपली पारंपारिक कला सादर केली. यामध्ये महादेव मनवकर, शंकर  मनवकर, शहाजी मनवकर, नवनाथ मनवकर, तसेच ढोलकी वादक  – सागर मनवकर,हार्मोनियम – गजानन लोहार, पारू कराडकर, रेणुका मलकापूरकर, सोनम काटे सुनिता कराडकर,लंका कराडकर आदी कलावंतांनी भाग घेतला. यावेळी कलाकारांनी गण, गवळण,लावणी , बतावणी  आणि वगनाट्य सादर केली.


खचाखच भरलेल्या सभागृहात तरुणाईने गाण्यावर ठेका धरला अन् मनसोक्तपणे नाचण्याचा आनंद लुटला. कलाकारांच्या सादरीकरणाला  प्रेक्षकांनी शिट्ट्या अन् टाळ्यांनी दाद देत सभागृह दणाणून सोडले. कलाकारांनीही आपल्या अदांनी अन् बहारदार लावण्या सादर करीत मने जिंकली.


या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  अर्चना टिळक, सुगत सोनवणे,डॉ. गणेश शिंदे,सागर चव्हाण उपाध्यक्ष (उपक्रम),सहकार्यवाह शरणम शिंगाडे
सल्लागार राजेंद्र अत्रे, डॉ. अभय शहापूरकर,
सदस्य धनंजय कुलकर्णी, दयानंद साबळे, सुरेश देवकुळे, प्रमोद जोगदंड, श्रीकांत साठे, अर्जुन धावारे, विशाल टोले, भैरू कदम,प्रसेनजित शिंगाडे, ताहेर शेख, दिग्विजय शिंगाडे, शुभम खोत, विजय उंबरे, सुमित शिंगाडे, विश्वनाथ काळे, सुमेध चिलवंत, ऋषीकेश गवळी, यशवंत शिंगाडे, संकेत नागणे, अक्षय दिवटे, सौरभ शिंगाडे, प्रविण सोनवणे, प्रसाद वाघमारे, प्रज्ञावंत ओहाळ, प्रशांत कांबळे, सारिपुत शिंगाडे यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.



चौकट

यावेळी जागर लोककलेचा या कार्यक्रमात सहभागी कलावंताने आपली कला सादर केली. झाडीपट्टी या परिसंवादात डॉ.राजकुमार मुसने म्हणाले की, झाडीपट्टी हा विदर्भातील एक नाटक प्रकार आहे. मागील 150 वर्षापासून वर्षापासून लोक कलावंत ही कला सादर करतात. अनेक मोठ्या कलावंतांनी झाडीपट्टी नाटकांमध्ये काम केले आहे. या नाटक प्रकारामध्ये सर्वकाही थेटपणे सादर केले जाते. झाडीपट्टीच्या प्रत्येक नाटकांमध्ये मनोरंजना सोबतच समाज प्रबोधन ही केले जाते. येणारा काळ हा झाडीपट्टीसाठी सुवर्णकाळ असल्याचेही त्यांनी सांगितले.

चौकट

आजचे कार्यक्रम

रविवार 18 ऑगस्ट रोजी स्थानिक कलवंतांचे सादरीकरण, नाट्यकलेचा जागर, राष्ट्रीय पातळीवरील कलाकारांचा सत्कार, झाडीपट्टी नाटक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *