
ओबीसी समाजाचे धनगरवाडी टोलनाका रास्ता रोको आंदोलन
धाराशिव जिल्ह्यातील ओबीसी समाज संघटित होणार – राम जवान
धाराशिव दि.23(प्रतिनिधी) – धनगरवाडी टोलनाका ता तुळजापुर येथे सकल ओबीसी समाजाच्या वतीने सोलापुर- हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग अडवुन रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ओबीसी नेते प्रा लक्ष्मण हाक्के सर व नवनाथ वाघमारे साहेब यांच्या आमरण उपोषणाला समर्थन देण्यासाठी व ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता इतर समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.यावेळी समाजाच्या वतीने विविध मागण्या शासनाकडे लेखी निवेदनाद्वारे देण्यात आल्या. यावेळी ओबीसी नेत्यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी मनोगत व्यक्त करताना ओबीसी नेते राम जवान म्हणाले की हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहु महाराज यांचा आहे. पण आरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्रात जाती-जाती भांडणे लावुन हा पुरोगामी महाराष्ट्र येथील नेते कोठे घेऊन जात आहेत असा प्रश्न उपस्थित केला. लोकशाहीत मतदाना सारखा पवित्र हक्क असताना जात बघुन महाराष्ट्रात मतदान होत आहे हे पुरोगामी महाराष्ट्राला परवडणारे नाही. राज्यातील ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता इतर कोणत्याही समाजाला आरक्षण द्यावे. इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. सरकार व विरोधी पक्ष सत्तेत अदलुन-बदलुन येतात व वर्षानुवर्षे फसवणुक करीत आहेत. ओबीसी नेते प्रा लक्ष्मण हाक्के सर, नवनाथ वाघमारे साहेब, व ससाणे साहेब हे आमरण उपोषणाला गेल्या दहा दिवसांपासून बसले आहेत. सरकार व विरोधी पक्ष जाणुन बुजुन या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले आहे. येणाऱ्या काळात ओबीसी समाज संघटित होऊन सरकारला धारेवर धरून हा आरक्षणाचा विषय मार्गी लावण्यासाठी कायदेशीर मार्गाने प्रयत्न करेल.
या आंदोलनात ओबीसी नेते राम जवान, अरविंद पाटील, उमेश काळे, म्हाळाप्पा गळाकाटे, बंडु धुते, श्रीमंत हाक्के, सुनील देवकर यांनी मनोगत व्यक्त केले.हा मोर्चा यशस्वी होण्यासाठी नवनाथ घोडके, आण्णा बंडगर, प्रमोद दाणे, रवी पाटील, विक्रांत दुधाळकर, स्वप्निल घुगे, राहुल राठोड, लक्ष्मण घुगे, गणेश बंडगर, गजेंद्र हाळदे, अनिकेत घोडके, मल्लिकार्जुन दुधभाते, अक्षय चेंडके, श्रीकांत घोडके, रमेश चेंडके, शशिकांत घोडके अमर चेंडके यांच्या सह असंख्य समाजबांधवांनी परिश्रम घेतले.