नीट परीक्षेच्या निकालाची सर्वोच्च न्यायालयाच्या अधिपत्याखाली चौकशी करा- डॉ प्रतापसिंह पाटील नीट परीक्षा संदर्भात नॅशनल टेस्टिंग एजन्सीला निवेदन

नीट परीक्षेच्या निकालाची सर्वोच्च न्यायालयाच्या अधिपत्याखाली चौकशी करा- डॉ प्रतापसिंह पाटील


नीट परीक्षा संदर्भात नॅशनल टेस्टिंग एजन्सीला निवेदन

Spread the love



धाराशिव प्रतिनिधी – नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारे दर वर्षी नीट परीक्षा घेतली जाते या परीक्षेमध्ये यावर्षी
देशभरातील ४,७५० केंद्रावर २४ लाख ६०७९ विद्यार्थ्यांपैकी २३ लाख ३१,२९७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
यामध्ये यावर्षी ७२०पैकी ७२० गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही  ६७ एवढी आहे मात्र खरा असंतोष व भीती यामध्ये आहे की एका सेंटरवर एकापाठोपाठ बसलेल्या ०७ विद्यार्थ्यांना सारखेच म्हणजे ७२० पैकी ७२० गुण आहेत त्यामुळे या परीक्षेत काही काळाबाजार झाला आहे काय अशी शंका सध्या पालक व विद्यार्थ्यांमध्ये आहे त्यामुळे या गोष्टीची सखोल चौकशी सर्वोच्च न्यायालयाचा अधिपत्याखाली व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी एका निवेदनाद्वारे नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे केली आहे.


या निवेदनात म्हटले आहे की,आतापर्यंत दरवर्षीही परीक्षा सुरळीतपणे सुरू आहे व त्याचे गुण देखील शंकास्पद नव्हते मात्र यावर्षी विद्यार्थ्यांना मिळालेले गुण हे  पालक व विद्यार्थ्यांना शंकास्पद वाटतात त्यामुळे या गुणांची चौकशी  सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीखाली एक उच्चस्तरीय समिती नेमून सखोल चौकशी करावी अशी मागणी यात केली आहे. तसेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे विद्यार्थ्यांना विश्वासाची हमी देणे देखील आवश्यक आहे कारण आतापर्यंत जवळपास १० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी निकालानंतर आत्महत्या केल्या आहेत या आत्महत्येची जबाबदारी नेमकी कोणाची हा प्रश्न देखील या ठिकाणी विचारण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *