
धाराशिवच्या बसस्थानकातील समस्येबाबत आमदार कैलास पाटील आक्रमक,
धाराशिव ता.12: राज्य परिवहन महामंडळाच्या महाव्यवस्थापक (बांधकाम) यांना बस स्थानकात असलेल्या समस्या सांगत आजपासून ही कामे लवकर करून प्रवशाना काही प्रमाणात सुविधा निर्माण करून देण्याच्या सूचना केल्या. या भेटीनं महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून तातडीने काम हाती घेतल्याच दिसत आहे.
धाराशिव येथील बस स्थानकामधील प्रवाशांच्या गैरसोयीच्या तक्रारी आल्यानंतर आमदार कैलास पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन समस्याची माहिती घेतली. प्रवाशी मंडळींना विचारणा केली व याबद्दल त्यांना आश्वासस्थ केले.धाराशिव येथील मध्यवर्ती बस स्थानकाचे सध्या बांधकाम चालु करण्यात आले आहे. पुर्वीचे स्थानक पाडण्यात आले आहे. त्यामुळे सध्या स्थानकाची सेवा पुर्णपणे कोलमडलेली आहे. बांधकाम संथगतीने चालु असुन ते वेळेत पुर्ण होण्यासाठी बांधकाम तत्परतेने पुर्ण करण्याच्या सुचना गुत्तेदाराला देण्यात याव्यात तसेच सध्या पावसाळयाचे दिवस आहेत. तिथे सगळीकडे पाणी साचुन खड्डे पडले आहेत. प्रवाशांना निवारा शेडची देखील सुविधा अपुरी आहे. शिवाय सगळीकडे मोठया प्रमाणात गैरसोय होत असुन नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शौचालयाची सुविधा करणे आवश्यक आहे.प्रवाशांच्या सुविधापेक्षा उपहारगृह व गुत्तेदार यांच्या सुविधाकड अधिक लक्ष दिल्याचे दिसून येत आहे. या सर्व गैरसोयी टाळण्यासाठी एस.टी. स्टॅडचे बांधकाम पुर्ण होईपर्यंत बस स्थानक इतरत्र स्थलांतरीत करणे आवश्यक आहे. धाराशिव येथील मध्यवर्ती बस स्थानकात प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी बस स्थानक बांधकाम पुर्ण होईपर्यंत इतरत्र स्थलांतरीत करण्याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा अशा सूचना महाव्यवस्थापक यांना दिल्या आहेत. ज्या अधिकारी लोकांना सूचना देऊनही त्यानी त्याचे पालन केलेले नाही त्यावर कारवाई करावी अशा देखील सूचना आमदार पाटील यांनी दिल्या आहेत. आमदार कैलास पाटील यांनी स्थानकाला भेट दिल्याने तातडीने दखल घेण्यात आली. आज ताबडतोब कामाला सुरुवात करून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात आला आहे. यापुढेही या बस स्थानकाकडे आपले लक्ष असणार आहे त्यामुळे कोणीही हलगर्जीपणा करू नये अन्यथा कोणाचीही गय केली जाणार नाही असे वक्तव्य यांनी व्यक्त केले.