नीटच्या परीक्षेतील गैरप्रकाराची तात्काळ चौकशी करा- खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

नीटच्या परीक्षेतील गैरप्रकाराची तात्काळ चौकशी करा- खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

Spread the love



धाराशिव ता.10: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (नीट ) यांच्याकडून चार मे  रोजी देशभरात घेण्यात आली होती. या परीक्षा प्रक्रिया बाबत मोठया तक्रारी येत आहेत. अतिशय महत्वाच्या परीक्षेत असा प्रकार होणं हे दुर्देवी आहे. त्यामुळे या परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करावी अशी मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सरकार कडे केली आहे.                                देशातल्या 571 शहरातील एकूण चार हजार 750 केंद्रावर 24 लाख सहा हजार 79 विद्यार्थ्यांपैकी 23 लाख 31 हजार 297 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षेचा निकाल हा 14 जून अपेक्षित असताना संबंधित एजन्सीने या परीक्षेचा निकाल चार जून रोजी जाहीर केला. परीक्षेत देशात 67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क्स मिळाले आहेत. दीड हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स दिले आहेत. विद्यार्थ्यांसह पालकांना परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचा संशय आहे.हरियाणातील एका केंद्रावरील प्रश्न पत्रिका उशिरा दिल्याचे कारण देऊन ग्रेस मार्क दिल्यामुळे चार विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क मिळालेले आहेत.  व्यावसायिक परीक्षा सिस्टिम ऑफ एलिमिनेशनवर आधारित आहे.बऱ्याचशा विद्यार्थ्यांना 718- 719 असे गुण प्रदान करण्यात आल्यायमुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये  परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याची शंका व्यक्त केली आहे. पालकांकडून व विद्यार्थ्यांकडून ही परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याबाबत विनंती करण्यात येत आहे.ही परीक्षा भारतातील सर्वात मोठी असण्याबरोबर वैद्यकीय व्यावसायिक शिक्षण घेण्याकरिता अत्यंत महत्त्वाची समजली जाते. परीक्षेतील दिलेल्या ग्रेस मार्क्सचा आढावा  उच्चस्तरीय समितीमार्फत घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी खासदार ओमराजे यांनी केली आहे.
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी नीट चे महानिदेशक यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *