नळदुर्ग बसस्थानकात युवकाला मारहाण; गोतस्करी प्रकरणाचा राग मनात ठेवून हल्ला

नळदुर्ग बसस्थानकात युवकाला मारहाण; गोतस्करी प्रकरणाचा राग मनात ठेवून हल्ला

Spread the love

नळदुर्ग (जि. धाराशिव), दि. 26 फेब्रुवारी 2025:
नळदुर्ग बसस्थानक येथे एका युवकाला जुन्या गोतस्करी प्रकरणाचा राग मनात ठेवून मारहाण केल्याची घटना घडली आहे.

फिर्यादी गणेश शिवराज मुळे (वय 20, रा. अणदुर) आणि त्यांचा मित्र शिवराज बोंगरगे हे बसस्थानकात असताना, आरोपी मुजमील शब्बीर कुरेशी, गौस कुरेशी, सलमान राजू कुरेशी व अन्य 6 जणांनी त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यात गणेश मुळे जखमी झाले असून, आरोपींनी त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

या घटनेची फिर्याद गणेश मुळे यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात दिली असून, पोलिसांनी भादंवि कलम 115(2), 352, 351(3), 189(2), 190, 191(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *