
शरद पवार विद्यालयाच्या प्रणव चव्हाणचा तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेत प्रथम क्रमांक
राजेगाव (ता. लोहारा) – डॉ. के. डी. शिंदगे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा आष्टा मोड येथील प्रशालेत संपन्न झाली. या स्पर्धेत शरद पवार विद्यालय, राजेगाव येथील इयत्ता दहावीचा विद्यार्थी प्रणव दत्ताजी चव्हाण याने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. त्याच्या या यशाबद्दल त्यास रु. 2100/- व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या विशेष यशाबद्दल आज शाळेच्या वतीने प्रणव चव्हाणचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी राजेगाव गावाचे प्रथम नागरिक सुरेश ज्ञानोबा देशमुख, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब देशमुख, ज्येष्ठ शिक्षक शिंदे सर, कोरे सर, सारोळे सर, महाजन मॅडम यांची उपस्थिती होती.
विद्यार्थ्याच्या या यशाबद्दल संपूर्ण विद्यालयात आनंदाचे वातावरण असून, शाळेच्या वतीने त्याचे कौतुक करण्यात आले. भविष्यात त्याला यश मिळावे, अशी शुभेच्छा यावेळी मान्यवरांनी दिल्या.

