
भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा अध्यक्षा राजश्री कदम यांचा सत्कार
शभारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा उस्मानाबाद यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही धम्म सहलीचे आयोजन करण्यात आले. या सहलीसाठी आदरणीय भंडारे सर, बी.एस. गायकवाड सर, वानखेडे सर आणि खोब्रागडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. दिनांक 16 जानेवारी रोजी सुरू झालेल्या या धम्म सहलीत श्रीलंकेतील प्रमुख बौद्ध स्थळांना भेट देण्यात आली. एकूण दहा दिवसांच्या या सहलीत 90 जणांनी सहभाग घेतला. सहभागी उपासक-उपासिकांसाठी उत्तम भोजन आणि निवास व्यवस्था करण्यात आली होती.
तुळजापूर येथील भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा अध्यक्षा राजश्री कदम यांनी या धम्म सहलीचे नेत्रुत्व केले. त्यांच्या उत्कृष्ट व्यवस्थापनाबद्दल आणि योगदानाबद्दल वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सहसचिव आर.एस. गायकवाड यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार केला.
या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेच्या माजी जिल्हा अध्यक्षा विजयमाला धावारे मॅडम, धम्म संस्कार विभाग प्रमुख विजय बनसोडे, वंचित बहुजन आघाडीचे तुळजापूर शहर अध्यक्ष धम्मशिल कदम, समता सैनिक दलाच्या लक्ष्मीताई कदम, तसेच आप्पासाहेब डावकरे, करण डावकरे, अजिंक्य डावकरे, संतोष कंटू कांबळे (अणदूर), जयश्रीताई डावकरे, हेमाताई कदम, कीर्ती गायकवाड, शीलाताई कदम, पुष्पाताई रणझुंजारे, संगीता कदम, प्रणिती कदम, सावित्री कदम यांच्यासह बौद्ध उपासक-उपासिका आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाने बौद्ध उपासक-उपासिकांमध्ये नवचैतन्य निर्माण केले असून, या उपक्रमामुळे बौद्ध विचारधारेचे प्रचार व प्रसाराचे कार्य अधिक दृढ झाले आहे.