प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट घटक 2.0 अंतर्गत दिंडेगाव आणि आरळी बुद्रुक येथे पाणलोट रथयात्रा उत्साहात संपन्न

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट घटक 2.0 अंतर्गत दिंडेगाव आणि आरळी बुद्रुक येथे पाणलोट रथयात्रा उत्साहात संपन्न

Spread the love


शतुळजापूर तालुक्यातील दिंडेगाव आणि आरळी बुद्रुक येथे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट घटक 2.0 अंतर्गत पाणलोट रथयात्रेचे आयोजन करण्यात आले. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि पाणलोट विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


दिंडेगाव येथे झालेल्या बैठकीत शालेय व्यवस्थापन समितीचे प्रमुख, माजी सरपंच नवनाथ पाटील, सरपंच बाळासाहेब पाटील, मुख्याध्यापक गायकवाड सर, पाणलोट समिती सचिव शरद पाटील, सहशिक्षक कोलते सर तसेच ग्रामस्थांनी सहभाग घेतला. पांडुरंग घोडके यांनी पाणलोट यात्रेचे महत्त्व पटवून दिले. विजय कांबळे यांनी विविध रांगोळी स्पर्धा, प्रभात फेरीसंदर्भात मार्गदर्शन केले.

यानंतर, “झाडे लावा, झाडे जगवा, पाणी आडवा, पाणी जिरवा” या घोषणांसह प्रभात फेरी काढण्यात आली. या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद लाभला.

आरळी बुद्रुक येथे शालेय व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक चव्हाण सर, पाणलोट समिती सचिव मकरंद बामनकर, सहशिक्षक चंद्रकांत ऊळेकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख कांबळे मॅडम आणि इतर सहकारी शिक्षक यांच्यासमवेत बैठक घेण्यात आली.
यावेळी, रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. पांडुरंग घोडके आणि विजय कांबळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या कलाकृतींचे कौतुक केले.


दिंडेगाव आणि आरळी बुद्रुक या गावांमध्ये वृक्षलागवड आणि बांधबंधिस्त विषयी श्रमदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. श्रमदानासाठी तारखा निश्चित करण्यात आल्या.
घोडके यांनी गावातील नागरिकांना शासनाच्या विविध योजना, शेतीविषयक प्रशिक्षण, अभ्यास सहली यामध्ये सहभाग घेण्याचे आवाहन केले.



या बैठकीत गावातील सरपंच, उपसरपंच, महिला व शेतकरी बचत गट, नेहरू युवा मंडळ, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या यशस्वी आयोजनाबद्दल विजय कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

पाणलोट रथयात्रेच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला गती मिळण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *