तुळजापूर मतदारसंघात महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार- Adv.धीरज पाटीलबेंबळी येथे निष्ठावंत कार्यकर्ता मेळावा संपन्न

तुळजापूर मतदारसंघात महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार- Adv.धीरज पाटील

बेंबळी येथे निष्ठावंत कार्यकर्ता मेळावा संपन्न

Spread the love

धाराशिव (प्रतिनिधी) – येत्या निवडणुकीत तुळजापूर मतदार संघात भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित विजयी होणार असा विश्वास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष Adv.धीरज पाटील यांनी व्यक्त केला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तुळजापूर मतदार संघातील धाराशिव तालुक्यातील 72 गावातील महाविकास आघाडीच्या निष्ठावंत कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. बेंबळी येथे अतिशय उत्साहात पार पडलेल्या या मेळाव्याला हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेना सहसंपर्क प्रमुख मकरंद उर्फ नंदू राजेनिंबाळकर म्हणाले की, जसे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) शिवसेना (ठाकरे) यासह मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने लढा देत जनता विरोधी भाजपचा पराभव केला तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत आपण एकजुटीने काम करून जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात विजय मिळवून भाजप व मिंध्ये गटाला जिल्ह्यातून हद्दपार करू.

कार्यकर्त्यांनी एकदिलाने कार्यरत राहावे येणारा काळ हा आपलाच असेल असा संदेश काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वासराव शिंदे यांनी बोलताना दिला.

मेळाव्याला काँग्रेसचे मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख सतीश सोमाणी, डिसीसी बँकेचे संचालक मेहबूब पाशा पटेल, धाराशिव तालुकाध्यक्ष विनोद वीर, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, बाजार समितीचे संचालक उमेश राजेनिंबाळकर, राष्ट्रवादीचे बाळासाहेब माने, जीवन बरडे, शिवसेना विभागप्रमुख मोईन पठाण, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष आयुब पठाण, मागासवर्गीय जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे, ओबीसी जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत, माजी सरपंच सत्तार शेख, युवा नेते सलमान शेख हजर होते.
यावेळी तुळजापूर मतदार संघातून निष्ठावंत कार्यकर्त्यांस संधी द्यावी अशा सूर उपस्थित कार्यकर्त्यामधून व्यक्त करण्यात आला.
सूत्रसंचालन अग्निवेश शिंदे यांनी केले तर आभार सत्तार शेख यांनी मानले.
बैठकीला ज्येष्ठ नेते अशोकराव पवार, जिल्हा उपाध्यक्ष सयाजीराव देशमुख, जिल्हा सरचिटणीस अशोक बनसोडे, सचिव सुरेंद्रदादा पाटील, विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष कफिल सय्यद, युवा नेते अमोल कुतवळ, अनिलकुमार लबडे, सुनील बडूरकर, संभाजी फरताडे, जिल्हा सचिव सौरभ गायकवाड, भारत काटे, संकेत पडवळ, संजय देशमुख, भारत चव्हाण, बालाजी माने, राजाभाऊ नळेगावकर, अतिक सय्यद, राजू तोरकडे, जुबेर काझी, मेहराज शेख यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *