तामलवाडी पोलीसांची धडाकेबाज कारवाई तलवार बाळगुन दशहत पसरविणा-या इसमास तलवारी सह घेतले ताब्यात

तामलवाडी पोलीसांची धडाकेबाज कारवाई तलवार बाळगुन दशहत पसरविणा-या इसमास तलवारी सह घेतले ताब्यात

Spread the love



धाराशिव (प्रतिनिधी) दि.9 तामलवाडी पोलीस ठाणेतील पोलीसांनी गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी मिळाली कि, मौजे गोंधळवाडी, ता. तुळजापुर येथे इसम नामे धनाजी मोटे हा तलवार बाळगुन लोकांचे मनात दहशत निर्माण होईल अशा प्रकारे फिरत आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने तामलवाडी पोलीसांनी तात्काळ मौजे गोंधळवाडी, ता. तुळजापुर येथे जावुन वरील इसमास ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव व पत्ता बाबत विचारणा केली असता त्याने त्याचे नाव धनाजी अभिमान मोटे, वय 38 वर्षे, रा. मौजे गोंधळवाडी, ता. तुळजापुर असे सांगितले. पोलीसांनी त्याचेकडुन धारधार पाते असलेली तलवार जप्त केली आहे.

इसम नामे धनाजी अभिमान मोटे, वय 38 वर्षे, रा. मौजे गोंधळवाडी, ता. तुळजापुर याने मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, धाराशिव याचे शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करुन स्वतःचे कब्जात तलवार बाळगुन लोकांचे मनात दहशत निर्माण होईल असे कृत्य केल्याने त्याचे विरुध्द तामलवाडी पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 सह कलम 4,25 शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव सो, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री गौहर हसन सो, मा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री डॉ. निलेश देशमुख सो यांचे मार्गदर्शनाखाली तामलवाडी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्री शैलेश पवार सो यांचे आदेशाने पोउपनि श्री प्रदिप टेकाळे, पोना/1531 काझी, पोअं/55 सुरनर, पोअं./311 गोपाळ सलगर होमगार्ड 1176 गुरव यांचे पथकानी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *