सीएससी,आधार ऑनलाईन सेंटर यांचे दरफलक लावण्याची सक्ती करावी या मागणीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

सीएससी,आधार ऑनलाईन सेंटर यांचे दरफलक लावण्याची सक्ती करावी या मागणीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

Spread the love



धाराशिव (प्रतिनिधी) – सध्या कोणतीही कागदपत्रे काढण्यासाठी नागरिक ऑनलाइन सेंटरला जातात त्या सेंटरमध्ये मनमानी पद्धतीने पैसे आकारले जातात यासाठी जिल्ह्यातील व शहरातील कार्यरत असलेल्या सीएससी,आधार ऑनलाईन सेंटर ठिकाणी त्यांचे दरफलक लावण्याची सक्ती करावी यासाठी मनोज खरे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे निवेदनात असे म्हटले आहे की धाराशिव शहर व जिल्ह्यातील कार्यरत असलेले सीएससी,आधार सेंटर हे त्यांच्याकडे आलेल्या ग्राहकांना मनमानी व अवाजवी रक्कम घेऊन त्यांची कामे करून दिली जात आहेत त्यामुळे नागरिकांची खूप मोठे आर्थिक पिळवणूक होत आहे तसेच सद्यस्थितीत लाडकी बहीण याबाबत देखील ते नागरिकांकडून फॉर्म भरण्यासाठी जास्त पैशाची मागणी करत आहेत हो तरी सीएससी,आधार सेंटर मधून जेवढे प्रमाणपत्र वितरित केले जातात त्याची भाव फलक हे ठळक अक्षरात व प्रथमदर्शी लावण्याची शक्ती करावी त्यामुळे नागरिकांची आर्थिक पिळवणूक होणार नाही. तसेच येत्या काळात सीएससी सेंटरच्या बाहेर दरफलक लागले नाहीत तर जिल्ह्यातील सर्व सीएससी सेंटरच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी मनोज खरे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *