
श्रीराम लाईफ इन्शुरन्स कंपनीत महिलेला 26 हजारांची फसवणूक! आरोपीविरोधात गुन्हा दाखल
धाराशिव (प्रतिनिधी) – श्रीराम लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या धाराशिव शाखेत एका महिलेला विश्वासात घेऊन 45,000 रुपयांची रक्कम घेतली आणि त्यातील फक्त काही पैसे परत करत उर्वरित 26,000 रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
फिर्यादी निर्मला बस्वेश्वर नगरे (वय 48, रा. समर्थनगर, धाराशिव) यांनी आनंदनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी किरण पाचपोर (रा. प्लॉट नं. 507, नंदनवन, नागपूर) याने दिनांक 08 नोव्हेंबर 2024 रोजी, श्रीराम लाईफ इन्शुरन्सच्या धाराशिव शाखेत, पॉलीसी हप्त्यासाठी पैसे घेतले.
त्यावेळी आरोपीने “कंपनीचे सर्व्हर डाउन आहे” असे कारण सांगून, कच्च्या पावतीवर 45,000 रुपये घेतले आणि ती रक्कम भरली जाईल, असा विश्वास फिर्यादीला दिला. मात्र, नंतर फक्त 19,000 रुपये परत केले, उर्वरित 26,000 रुपये न देता फसवणूक केली.
या प्रकरणी फिर्यादीने 08 जून 2025 रोजी तक्रार दाखल केली असून, आनंदनगर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 316(5), 318(4) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.