खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द कराविविध मागासवर्गीय संघटना व पदाधिकार्‍यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करा

विविध मागासवर्गीय संघटना व पदाधिकार्‍यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Spread the love



धाराशिव, दि. 25 -शहरातील पार्वती हॉस्पिटल येथे गंभीर अवस्थेत असलेल्या एका मागासवर्गीय रुग्णास जाणीवपूर्वक उपचार देण्यास नकार देण्यात आला आहे. त्याचबरोबर रुग्णाची प्रकृती अत्यवस्थ असल्याने उपचारासाठी आग्रह धरणार्‍या नातेवाईकांना मारहाण करण्यात आली आहे. संबंधित रुग्णालय प्रशासनाने गावगुंडांना बोलावून तसेच रुग्णालयातील कर्मचार्‍यांकडून रुग्णास अत्यंत खालच्या पातळीची वागणूक दिली असल्याचा आरोप करत त्या रूग्णालयाचा परवाना रद्द करण्याची मागणी मागासवर्गीय संघटनांच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे निवेदन पाठवून करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकार्‍यांमार्फत पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्वसामान्य व गरजू नागरिकांसाठी कार्यरत असणार्‍या रुग्णालयांनी जात, धर्म वा सामाजिक स्तर पाहून उपचार नाकारणे हा गंभीर आणि दखलपात्र गुन्हा आहे. त्यामुळे अशा प्रकारची मनमानी व भेदभाव करणार्‍या खासगी रुग्णालयांवर कठोर कायदेशीर कारवाई आवश्यक आहे. घटनेची तटस्थपणे सखोल चौकशी करून संबंधित डॉक्टर आणि रुग्णालय व्यवस्थापनावर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच त्यांचा वैद्यकीय परवाना रद्द करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.

या निवेदनावर भैय्यासाहेब नागटिळे, संदीप बनसोडे, मिलिंद रोकडे, सतीश कसबे, विकास बनसोडे, रोहित बनसोडे, आकाश बनसोडे, गणेश वाघमारे, आदर्श बनसोडे, हृतिक बनसोडे, सोमराज गायकवाड, करण माळाळे, हुसेन शेख, करण अंकुशराव, सोहेल शेख, हरीश वाघमारे, नागराज साबळे, अनुज झेंडे, सिद्धांत गायकवाड, विवेक जाधव, यश ओहळ, पृथ्वीराज सरवदे, प्रजोत बनसोडे, रोहित गायकवाड, शैलेंद्र शिंगाडे, कैलास लोंढे, प्रशिक गोपाळे, ऋषी गायकवाड, महेश बिडबाग, पृथ्वीराज लोंढे, कुमार गायकवाड, सचिन देवकते, रमाकांत लकडे, राजेंद्र वाघमारे, बन्नी गायकवाड, बबलू सूर्यवंशी, करण वाघमारे आदींसह विविध संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची स्वाक्षरी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *